शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

राजकारणापेक्षा भूमीचा विकास करा : राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 18:26 IST

कोकण ही नररत्नांची खाण आहे. त्यातील अनेक रत्ने ही रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे या भूमीला एक वेगळी उंची आहे. अशा या भूमीमध्ये आपण काम करीत असल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे. प्रत्येकवेळी राजकारण करण्यापेक्षा राजकारणापलिकडे जाऊन या भूमीचा विकास करा, असा मौलिक सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवरूख येथील बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना दिला.

ठळक मुद्देराजकारणापेक्षा भूमीचा विकास करा : ठाकरेदेवरूख येथील बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना सल्ला

देवरूख : कोकण ही नररत्नांची खाण आहे. त्यातील अनेक रत्ने ही रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे या भूमीला एक वेगळी उंची आहे. अशा या भूमीमध्ये आपण काम करीत असल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे. प्रत्येकवेळी राजकारण करण्यापेक्षा राजकारणापलिकडे जाऊन या भूमीचा विकास करा, असा मौलिक सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवरूख येथील बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना दिला.शहरातील द्रौपदी इन हॉटेलच्या सभागृहात आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे यांनी २२ मेपासून कोकण दौऱ्याला प्रारंभ केला आहे.

शुक्रवारी ठाकरे हे देवरूखनगरीत आले होते. यावेळी ठाकरे यांनी प्रथम देवरूखची ग्रामदेवता श्री सोळजाई देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर झालेल्या बैठकीत तालुका कार्यकारिणी कशाप्रकारे करावी, याबाबत त्यांनी सूचना दिल्या. आपल्याला अपेक्षित असलेले काम सांगून त्यांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, पक्षवाढीसाठी प्रयत्न करावा, असे सांगितले. त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे स्पष्ट केली.बैठकीला माजी आमदार नितीन सरदेसाई, नेते शिरीष सावंत, राज्य सरचिटणीस व कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण, उपाध्यक्ष सत्यवान दळवी, जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, संजय नाईक, मनोेज हाटे, संगमेश्वर तालुका संपर्कप्रमुख श्रीपत शिंदे, शहराध्यक्ष अनुराग कोचिरकर, सागर संसारे, नगरसेविका सान्वी संसारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

टॅग्स :konkanकोकणRaj Thackerayराज ठाकरेRatnagiriरत्नागिरी