शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : ३४३ बांधकामे नियमित करण्याला फटका, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोहिम थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 16:38 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील सरकारी जमिनीवरील ३४३ अनधिकृत घरे शासनाच्या धोरणानुसार कायम करण्यात येणार होती़ मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे नियमित करता येणार नाही, असा निर्णय दिल्याने जिल्ह्यातील ३४३ अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मोहिमेला फटका बसणार आहे़. 

ठळक मुद्देअनधिकृत बांधकामे नियमित करता येणार नाहीत, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयग्रामपंचायतींनी अनधिकृत बांधकामांची केली होती पाहणी, जिल्हा परिषदेला अहवाल

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सरकारी जमिनीवरील ३४३ अनधिकृत घरे शासनाच्या धोरणानुसार कायम करण्यात येणार होती़ मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे नियमित करता येणार नाही, असा निर्णय दिल्याने जिल्ह्यातील ३४३ अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मोहिमेला फटका बसणार आहे़. दि़ ३१ डिसेंबर, २०१५ पूर्वीच्या अवैध, अनधिकृत इमारतींना सरंक्षण देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्यात दुरुस्ती केली होती़ त्याचा फायदा राज्यभरातील सरकारी जमिनींवर असलेल्या अनधिकृत, अवैध बांधकामांना मिळणार होता़ कारण ही सर्व बांधकामे नियमित करण्यात येणार होती़. 

सरकारी जमिनींवरील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने अशा बांधकामांची पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी तपासणी करुन सदरचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला होता. शासनाच्या धोरणानुसार ही अनधिकृत, अवैध बांधकामे अधिकृत करण्याच्या दृष्टीने धावपळ सुरु झाली होती़ मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने शासनाने घेतलेल्या अनधिकृत, बेकायदेशीर, अवैध बांधकामांना कायम करता येणार नसल्याचा निर्णय दिल्याने जिल्ह्यातील अवैध, अनधिकृत ३४३ बांधकामांना नियमित करण्याचे मनसुबे उधळले आहेत़ मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या मोहिमेलाही चाप बसला आहे़. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत ३४३ घरे अनधिकृत आहे़. 

तालुकानिहाय अनधिकृत बांधकामे

  1. रत्नागिरी २६५
  2. चिपळूण ४७
  3. दापोली १०
  4. लांजा ५
  5. मंडणगड १६ 

एकूण- ३४३

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी