शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत भीषण अपघात! ट्रकची मॅजिक प्रवासी रिक्षाला धडक; २ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 09:16 IST

Dapoli Accident: दापोली तालुक्यात झालेल्या भीषण अपघात झाला असून, काही जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Dapoli Accident: समाेरून येणाऱ्या ट्रकने मॅजिक प्रवासी रिक्षाला दिलेल्या जाेरदार धडकेत रिक्षातील आठ जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. यामध्ये दाेन मुलींचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण हाेता की, प्रवासी रिक्षा रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडली. हा अपघात रविवारी (२५ जून) दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास दापाेली - हर्णै मार्गावरील आसूद येथील जाेशी आळी येथे झाला. या अपघातानंतर फरार झालेल्या ट्रक चालकासह क्लिनरला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मॅजिक प्रवासी रिक्षाचालक अनिल उर्फ बॉबी सारंग (४५) याच्यासह मरियम तौफिक काझी (६), स्वरा संदेश कदम (८), संदेश कदम (५५), फराह तौफिक काझी (२७, सर्व रा. अडखळ, दापाेली) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर वंदना चाेगले (३८), मीरा महेश बोरकर (२२, रा. पाडले, दापाेली) आणि समिया इरफान शिरगावकर (५५, रा. अडखळ) यांचा दापाेली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. विनायक हशा चोगले (४५), ज्योती चोगले (९), विनोद चोगले (३०, सर्व रा. पाजपंढरी, दापाेली), श्रद्धा संदेश कदम (१४, रा. अडखळ, दापाेली), स्वप्ना संदेश कदम (४०, रा. अडखळ, दापोली) या जखमींवर दापाेली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूमी सावंत (१७), मुग्धा सावंत (१४, दाेघीही रा. हर्णै, दापाेली) यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

हर्णै येथील प्रवासी मॅजिक गाडी चालक अनिल उर्फ बॉबी सारंग हे दापाेलीकडून हर्णैकडे प्रवासी रिक्षा (एमएच ०८, ५२०८) घेऊन जात हाेते. दापाेली - हर्णै मार्गावरील आसूद येथे रिक्षा आली असता, समाेरून येणाऱ्या ट्रक (आरजे १४, जीपी ९८३२)ने जाेरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त हाेती की, प्रवासी रिक्षा रस्त्याच्या बाजूला कलंडली. यात रिक्षाचा चेंदामेंदा झाला. त्यात चालक अनिल सारंग याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पाेलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली हाेती. त्यामुळे घटनास्थळी माेठ्या प्रमाणात गर्दी केली झाली हाेती. नागरिकांनी तातडीने मदत करून जखमींना दापाेली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली हाेती. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात एकच टाहाे फाेडला. या अपघाताची नाेंद दापाेली पाेलिस स्थानकात करण्याची कार्यवाही सुरू हाेती.

अडखळच्या कदम कुटुंबीयांवर घाला

दापोली तालुक्यातील अडखळ गावचे कदम कुटुंबीय आपल्या सासूरवाडीला आजारी सासूला पाहण्यासाठी सावर्डे (ता. चिपळूण) येथे गेले होते. तिथून परत आल्यावर दापोलीत सामान खरेदी करून घरी जाण्यासाठी ते रिक्षातून निघाले हाेते. या अपघातात संदेश कदम, स्वरा कदम या बापलेकीचा जागीच मृत्यू झाला. तर याच वाहनातून प्रवास करणारी पत्नी स्वप्ना संदेश कदम व मुलगी श्रद्धा संदेश कदम या गंभीर जखमी झाल्या आहेत.

चालकाच्या मुलाचा हाेता वाढदिवस

मॅजिक प्रवासी रिक्षाचा चालक अनिल सारंग यांच्या मुलाचा रविवारी (२५ जून) वाढदिवस हाेता. या वाढदिवसाची तयारीही घरी करण्यात आली हाेती. सायंकाळी ते वाढदिवसासाठी घरी जाणार हाेते. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. वडिलांची वाट पाहणाऱ्या मुलाला पुन्हा वडील भेटलेच नाहीत. सारंग यांच्या मृत्यूमुळे घरच्यांना धक्काच बसला.

 

टॅग्स :dapoli-acदापोलीAccidentअपघात