शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावी..महावितरणचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:06 IST

गणेशोत्सव सुरू झाला आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणण्यात आल्या आहेत. आराशीला सुशोभित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, विद्युत रोषणाई करीत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावीमहावितरणचे आवाहन : विद्युत रोषणाई करताना सावधान

रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू झाला आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणण्यात आल्या आहेत. आराशीला सुशोभित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, विद्युत रोषणाई करीत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे.गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असली तरी तात्पुरती सवलतीच्या दरात वीजजोडणी घेणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात अवघी १९ आहे. रत्नागिरी शहरात ६, राजापूर १, लांजा १, चिपळूण शहर ४, खेडमध्ये १, दापोली १ मध्ये २, दापोली २ मध्ये १, मिळून १६ जोडण्या घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून सिंगल फेजचे एकूण १० व थ्री फेजचे ६ मिळून १६ जोडण्यांची मागणी केली होती, त्यानुसार महावितरणकडून जोडण्या देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असताना महावितरणने उत्सव कालावधीत महावितरणने सवलतीच्या दरात वीजपुरठा घेण्याचे आवाहन केले आहे. उत्सव कालावधीसाठी सवलतीच्या दरात वीज पुरवठा केला जातो. प्रतियुनिट ४ रूपये ३८ पैसे दराने वीज दर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्सव कालावधीसाठी वीज जोडणी देत असताना अनामत रक्कम घेण्यात येते. अनामत रकमेतून वीज वापराच्या रकमेशिवाय उर्वरित रक्कम संबंधित सार्वजनिक मंडळांना परत करण्यात येणार आहे.वीज वाहिन्यांसाठी गणेशमूर्ती अडचणीच्या ठरणार नाहीत, अशा प्रकारे ठेवून प्राणांतिक अपघात टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. शिवाय गणपती उत्सवाच्या कालावधीत वीज जोडणी व रोषणाई मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून करण्याचे आवाहन केले आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विद्युत संचाच्या जोडणीची तपासणी विद्युत निरीक्षकांकडून करून घ्यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी खड्डे करताना वीज वाहिन्या किंवा भूमिगत वाहिन्यांना धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरगुती, सार्वजनिक ठिकाणी वाहिन्या उघड्या राहणार नाहीत, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अखंड वीजपुरवठाविजेच्या लघुदाब व उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा या देखाव्याला स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावे, तसेच श्रींच्या मिरवणुकीवेळी वीज वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, अशी खबरदारी घ्यावी. उत्सवाच्या काळात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे, असे अधीक्षक अभियंता प्रभाकर पेठकर यांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी