शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत संततधार, शाळा सोडल्या, राजापूर पुन्हा जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 17:46 IST

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी संततधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वेरवली कोंड येथे विद्युत भारीत तार तुटून दोन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ७.३० वाजता घडली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत संततधार, शाळा सोडल्या, राजापूर पुन्हा जलमय

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी संततधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वेरवली कोंड येथे विद्युत भारीत तार तुटून दोन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ७.३० वाजता घडली आहे.रत्नागिरी शहरातही पावसाचा सकाळपासूनच जोर असल्यामुळे शहरातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील अडरे नदीला पूर आला परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने विद्यार्थी, कामगारांना पुन्हा माघारी फिरावे लागले. वशिष्ठी नदीने पुन्हा पातळी सोडल्यामुळे चिपळूण बाजारपेठेत पाणी झाले असून शहर जलमय झाले आहे.नदीतील पाणी शेतात घुसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कान्हे पुलावरून पाणी जात असल्याने हा मार्गही बंद झाला आहे. असाच पाऊस राहिल्यास पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळित होणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. पावसामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणीच पाणी झाले असून चांदेराइ - लांजा मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गावर ५ फूट पाणी आहे.संगमेश्वर तालुक्यात सलग  मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संगमेश्वर, माखजनला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे लांजा चिंचुर्टी येथे जाणाºया घाटातील मार्गावरील मोरी वाहून गेल्याने एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे येथील नागरिक व विद्यार्थ्यांना १० किलोमीटरवर पायपीट करावी लागत आहे.राजापूर शहरातपुन्हा पुराचे पाणीअर्जुना व कोदवली नद्यांना पाण्याची पातळी वाढत आहे शाळा-महाविद्यालये सोडून दिली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे शहरात येणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. व्यापारी व नागरिकांनी सुरक्षित स्थळी सामान हलवले आहे. सोमवारी सकाळ पासूनच पावसाचा जोर वाढला होता. सोमवारी सकाळपासून शहरातील जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. सोमवारी शिवाजी पथ मछी मार्केट, वरची पेठ भागात पुराचे पाणी भरले होते . पावसाचा जोर अद्यापही कायम असल्यामुळे पाणी वाढत आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी