शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी, चिपी विमानतळांना उद्या सुरेश प्रभू यांची भेट, विमानसेवा लवकर सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 18:18 IST

कोकणच्या पर्यटन व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची असलेली प्रवासी विमानसेवा लवकर सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे १ एप्रिल रोजी रत्नागिरी विमानतळ व सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी, चिपी विमानतळांना उद्या सुरेश प्रभू यांची भेटप्रवासी विमानसेवा लवकर सुरु होणार

रत्नागिरी : कोकणच्या पर्यटन व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची असलेली प्रवासी विमानसेवा लवकर सुरु होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे १ एप्रिल रोजी रत्नागिरी विमानतळ व सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेनंतर सुरू होणारी विमानसेवा कोकणच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणार आहे.सुरेश प्रभू हे १ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोकण विकासासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनतर्फे अंबर हॉल, रत्नागिरी येथे आयोजित महिला सबलीकरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

यानंतर ते हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील व कुडाळ येथे ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशन आयोजित महिला सबलीकरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर गेली २० वर्षे रखडलेल्या चिपी विमानतळाची ते पाहणी करणार आहेत.

यावेळी ते अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेणार आहेत. हवाईमंत्री असल्याने विमानतळ सुरू करण्याचा मार्ग ते सोपा करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.रत्नागिरी विमानतळ हे तटरक्षक दलाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर या विमानतळाच्या विस्ताराचे काम वेगात सुरू होते. येथील धावपट्टीची लांबीही वाढवण्यात आली असून, येथून प्रथम तटरक्षक दलाची विमान वाहतूक सुरू होईल व मे २०१८मध्ये प्रवासी विमान वाहतूक सुरू होणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.सिंधुदुगार्तील चिपी विमानतळाकरिता आतापर्यंत अनेक मुहूर्त जाहीर झाले. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येत्या जूनमध्ये विमान टेक आॅफ करेल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, अधिवेशन काळात आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उत्तर देताना या विमानतळाचे उदघाटन नेमके कधी होईल, याबाबत ठोस आश्वासन दिलेले नाही. मात्र, या दौऱ्यामुळे ही विमानतळे लवकरच सुरू होतील, अशी आशा आहे.राऊंड टेबल कॉन्फरन्स रत्नागिरीतकोकण विकासाच्या दृष्टीने कृषी, मत्स्य, पर्यटन व वाहतूक या क्षेत्रातील विविध संधी तसेच नव्याने होणाऱ्या प्रकल्पांना गती देण्याकरिता केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली देशातील एपेडा, एमपेडा, भारतीय कृषी संस्था तसेच केंद्रीय पर्यटन बोर्ड, औद्योगिक विकास संस्था, रबर बोर्ड, स्पाईस बोर्ड, काजू निर्यात बोर्ड, आरोग्य प्राधिकरण, लेदर इंडस्ट्रीज, जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्रीज, टेक्सटाईल्स इंडस्ट्रीज, फूड प्रोसेसिंग, नाबार्ड, शिपिंग पोर्ट आणि अनेक राष्ट्रीय बँकांचे प्रतिनिधी यांच्या प्रमुखांची राऊंड टेबल कॉन्फरन्स मंत्री सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत होत आहे.

कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी येथील तरुणांना कोकणातच नोकरी, व्यवसाय उपलब्ध करण्यासाठी ही कॉन्फरन्स महत्त्वाची ठरणार आहे. 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूChipi airportचिपी विमानतळRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग