शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : जिवलग मित्रानेच केला घात, अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीपोटी खून ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:38 IST

माळवी येथील दिनेश शिगवण यांचा खून त्याचा मित्र संतोष निर्मळ यानेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून एकट्यानेच खून केला की अजून दुसरे कोणी साथीदार आहेत याबाबत पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणात संतोष याच्यासह दिनेशची दुसरी पत्नी संगीतालाही पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली.

ठळक मुद्देजिवलग मित्रानेच केला घातअनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीपोटी खून ?संतोष निर्मळसह संगीतालाही अटक

दापोली : माळवी येथील दिनेश शिगवण यांचा खून त्याचा मित्र संतोष निर्मळ यानेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून एकट्यानेच खून केला की अजून दुसरे कोणी साथीदार आहेत याबाबत पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणात संतोष याच्यासह दिनेशची दुसरी पत्नी संगीतालाही पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली.दिनेश शिगवण याचा शुक्रवारी निर्घृणपणे खून झाला असल्याचे उघड झाले होते. दिनेशचा खून कोणी व का केला असावा याबद्दल वेगवेगळ्या चर्चेला पेव फुटले होते. खून करणाऱ्याने अतिशय थंड डोक्याने व पूर्वनियोजित हा खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अतिशय शिताफीने खुन्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दिनेशची पहिली पत्नी दिव्या आडे येथे कामाला जात होती. मात्र दुसरी पत्नी संगीता घरीच असायची. ती मोलमजुरी करायची. दिनेश व संतोष यांची मैत्री होती. इलेक्ट्रीकचे काम घेतल्यावर दिनेशचा मदतनीस म्हणून संतोष नेहमी त्याच्यासोबत असायचा. संतोषचे दिनेशच्या घरी नेहमी जाणे येणे होते. त्यामुळे संतोषचे दिनेशच्या पत्नीसोबत सूत जुळले होते. त्यामुळे दोघे नेहमी भेटण्याची एकही संधी सोडत नव्हते.जेवायला बऱ्याचदा संतोष दिनेशच्या घरी असायचा. दिनेशला संतोष व संगीताच्या जवळीकबद्दल माहीत झाले होते. त्याच कारणावरुन त्या दोघांमध्ये खटके उडत होते. शुक्रवारी दिनेश सकाळी नेहमीप्रमाणे गुरं लावायला गेला असता पूर्वनियोजितपणे त्याचा काटा काढण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. पंरतु दिनेशचा मृतदेह ज्याठिकाणी आढळून आला त्या ठिकाणापासून गाव व त्याची गुरं लावण्याची जागा खूप लांब आहे. त्यामुळे या प्रकरणात एकापेक्षा अधिक जणांचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

संतोष निर्मळ याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली असून याप्रकरणी त्याला अटकसुद्धा करण्यात आली आहे. दिनेशची दुसरी पत्नी संगीताला हिलाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना ५ दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMurderखून