शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : शिमगोत्सवानंतर मुंबईला जाणाऱ्या गुरव कुटुंबियांवर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 11:38 IST

खेड तालुक्यातील शिवफाटा येथे काल (गुरूवारी) मध्यरात्री १.३० वाजता बोलेरो आणि ईको कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सोलगाव (ता. राजापूर) येथील राजेंद्र अनंत गुरव (४५) यांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देशिमगोत्सवानंतर मुंबईला जाणाऱ्या गुरव कुटुंबियांवर काळाचा घालाजखमींना चिपळूण आणि डेरवण येथे उपचारासाठी दाखल

रत्नागिरी : खेड तालुक्यातील शिवफाटा येथे काल (गुरूवारी) मध्यरात्री १.३० वाजता बोलेरो आणि ईको कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सोलगाव (ता. राजापूर) येथील राजेंद्र अनंत गुरव (४५) यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात ईको गाडीतील आणखी पाचजण जखमी झाले असून, त्यांना नजीकच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे कुटुंब शिमगोत्सवासाठी आपल्या गावी आले होते. शिमगोत्सव आटोपून हे कुटुंब मुंबईला जात असताना हा अपघात झाला.या अपघातात सूरज चंद्रकांत गुरव (२२), स्वप्नील चंद्रकांत गुरव (३१), स्वानंदी स्वप्नील गुरव (२५), नयना उर्फ सान्वी सचिन गुरव (२५) आणि प्रेम गुरव (१६) हे जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने चिपळूण आणि डेरवण येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच खेडमधील मदत फाऊंडेशनच्या प्रसाद गांधी, बुराण टांके, विवेक बनकर, अमित वनकुटे, सुजित घोडेराय यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली.अपघातानंतर बोलेरो गाडीच्या चालकाने मात्र घटनास्थळावरून पलायन केले. त्याठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी ही गाडी वापरण्यात येत आहे.

हा अपघाता इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. अपघाताचे वृत्त सोलगाव येथील गावी समजताच अनेकांना धक्का बसला. त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात