शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पत्नीच्या अवयवदानातून स्मृती राहणार चिरंतन, शिल्पा रेडीज यांच्या मृत्यूनंतर पतीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:29 IST

आपली जवळची व्यक्ती कायमस्वरूपी निघून जाण्याचे दु:ख कधीच मागे सारता येत नाही. पण प्रत्यक्ष पत्नीच्या निधनानंतरही दु:ख बाजुला सारून तिचे अवयव दान केले तर इतर व्यक्तिंचे जीवन प्रकाशमय होईल, अवयवाच्या माध्यमातून पत्नीचेही अस्तित्व राहील, अशा भावनिक हेतूने रत्नागिरीतील अजय रेडीज यांनी पत्नी शिल्पा रेडीज यांचे आपल्या कुटुंबियांच्या सहविचाराने अवयवदान करून समाजाला अवयवदानाचे श्रेष्ठत्व पटवून दिले.

ठळक मुद्देपत्नीच्या अवयवदानातून स्मृती राहणार चिरंतनशिल्पा रेडीज यांच्या मृत्यूनंतर पतीचा उपक्रम समाजाला पटवून दिले अवयवदानाचे श्रेष्ठत्व

रत्नागिरी : आपली जवळची व्यक्ती कायमस्वरूपी निघून जाण्याचे दु:ख कधीच मागे सारता येत नाही. पण प्रत्यक्ष पत्नीच्या निधनानंतरही दु:ख बाजुला सारून तिचे अवयव दान केले तर इतर व्यक्तिंचे जीवन प्रकाशमय होईल, अवयवाच्या माध्यमातून पत्नीचेही अस्तित्व राहील, अशा भावनिक हेतूने रत्नागिरीतील अजय रेडीज यांनी पत्नी शिल्पा रेडीज यांचे आपल्या कुटुंबियांच्या सहविचाराने अवयवदान करून समाजाला अवयवदानाचे श्रेष्ठत्व पटवून दिले.अजय रेडीज यांच्या पत्नी शिल्पा (४५ वर्षे) गेली काही वर्षे एका खासगी आस्थापनेत काम करत होत्या. त्या सदैव हसमुख, मनमोकळ्या स्वभावाच्या होत्या. नेहमीच सहकार्याच्या भावनेने काम करताना त्यांचा जनसंपर्कही चांगला होता.

खेड येथील माहेर असलेल्या शिल्पा रेडीज सासरीही सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना काही वर्षांपूर्वी हृदयाचा त्रास होत होता. मात्र, दीड - दोन वर्षांपूर्वी मुंबईत त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांच्या तब्बेतीची कुठलीच तक्रार नव्हती.गेल्या आठवड्यात त्यांना अचानक त्रास होऊ लागला. अस्वस्थ वाटू लागल्याने ज्या रूग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, त्या मुंबईतील प्रसिद्ध खासगी रूग्णालयात तातडीने हलवावे लागले. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

जिच्याबरोबर सोळा - सतरा वर्षांचा संसार केला, ती पत्नीच आपल्याला आणि बारा वर्षाच्या मुलाला सोडून गेल्याने अजय रेडीज यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, तेही सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे असल्याने त्यांनी स्वत:ला सावरले. त्यांच्या बहिणी, मेहुणे आदी कुटुंबियांच्या विचाराने पत्नीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिल्पा रेडीज यांचे डोळे, यकृत, मूत्रपिंड दान केल्याने पाच गरजू व्यक्तिंना नवीन जीवन मिळणार आहे.नवजीवन मिळतेमृत्यूनंतर देह नश्वर ठरतो. मात्र, आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयवदान केले तर अनेक गरजू लोकांना त्यांचा लाभ मिळतो, त्यातून नवजीवन मिळते. प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तिचे अवयवदान करून अवयवदान श्रेष्ठ दान असल्याचे दाखवून दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHealthआरोग्य