शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

Ratnagiri: मंडणगडच्या रोशनीची भेट आई-वडिलांसाठी शेवटची, अहमदाबाद विमान दुर्घटनेत झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:50 IST

आईला अजूनही आस

मंडणगड : लंडन येथे जाण्यासाठी राेशनी राजेंद्र साेनघरे (२७) ही आई-वडिलांचा निराेप घेऊन निघाली हाेती. मात्र, अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत तिचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आणि तिने आई-वडिलांचा घेतलेला ताे निराेप अखेरचा ठरला. मुंबईतील डाेंबिवली येथे राहणारी राेशनी मूळची मंडणगड तालुक्यातील बुरी येथील राहणारी असून, तिच्या जाण्याने बुरी गावावरही शाेककळा पसरली आहे.आई राजेश्री, वडील राजेंद्र, भाऊ विघ्नेश यांच्या समवेत ती डोंबिवली येथे वास्तव्याला होती. लहानपणीच तिने हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न बाळगले हाेते. मुंबईमध्ये शिक्षण घेतलेली राेशनी सन २०२१ मध्ये ती स्पाइस जेटमध्ये नोकरीला लागली हाेती. तिथे दोन वर्षे सेवा केल्यानंतर २०२४ मध्ये ती एअर इंडियामध्ये रुजू झाली होती. इन्स्टाग्रामवर रोशनी हिचे ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत, ती एक ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर आहे. अहमदाबाद येथील अपघातात तिचा मृत्यू झाल्याचे कळताच मर्चंट नेव्हीमध्ये असलेला भाऊ व वडील तातडीने अहमदाबादला रवाना झाले हाेते.सोशल मीडियावर वावरहवाई सुंदरी म्हणून काम करण्याबरोबर रोशनी समाजमाध्यमात विशेष प्रसिद्ध होती. इन्स्टाग्रामवर रोशनीचे ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत, ती एक ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आहे.

गावाशी आजही घट्ट नातेसोनघरे कुटुंब मुंबईत वास्तव्यास असले तरी बुरी गावाशी त्यांचे नाते आजही घट्ट आहे. दोन दिवसांपूर्वीच देवीच्या उत्सवासाठी ती गावी आली होती. अधिक सुटी नसल्याने देवीची ओटी भरुन ती मुंबईकडे गेली.

आईला अजूनही आस आहेअपघाताची बातमी कळताच मर्चंट नेव्हीमध्ये असलेला भाऊ व वडील तातडीने अहमदाबादला रवाना झाले. अपघाताच्या धक्क्यातून तिची आई अद्याप सावरलेली नाही. आपली मुलगी सुरक्षित परत येईल, अशी आशा तिला अजूनही वाटत आहे.

मुलांना आवडीच्या क्षेत्रासाठी प्रोत्साहनसोनघरे कुटंब सुरुवातीला मुंबईतील ग्रँड रोड परिसरात राहात होते. दोन वर्षापूर्वी हे कुटुंब डोंबिवलीत स्थायिक झाले. रोशनीचे वडील टेक्निशियन आहेत. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कायम प्रोत्साहन दिले. त्यामुळे रोशनीने हवाई क्षेत्रात, तर तिच्या भावाने मर्चंट नेव्हीमध्ये पाय रोवले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाGujaratगुजरातRatnagiriरत्नागिरी