शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरीतील एकांकिका स्पर्धेत सांगलीच्या तेरे मेरे सपने एकांकिकेने पटकावला चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:17 IST

रत्नागिरी भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखा आयोजित व रत्नागिरी नगर परिषद प्रायोजित शंकर घाणेकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका चषक सांगलीतील श्री भगवती क्रिएशन्सच्या तेरे मेरे सपने या एकांकिकेने पटकावला. मुंबईतील नाट्यकीर्तीच्या इव्होल्युशन अ क्वेश्चन मार्कने द्वितीय व इचकरंजीच्या अविरत कलामंचच्या अफूने तिसरा क्रमांक मिळवला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालाच्या म्याडमला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

ठळक मुद्देशंकर घाणेकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका चषक स्पर्धासावरकर नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरणमुंबईत मानाचि संस्थेमार्फत रत्नागिरीत लेखनाची कार्यशाळा

रत्नागिरी भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखा आयोजित व रत्नागिरी नगर परिषद प्रायोजित शंकर घाणेकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका चषक सांगलीतील श्री भगवती क्रिएशन्सच्या तेरे मेरे सपने या एकांकिकेने पटकावला. मुंबईतील नाट्यकीर्तीच्या इव्होल्युशन अ क्वेश्चन मार्कने द्वितीय व इचकरंजीच्या अविरत कलामंचच्या अफूने तिसरा क्रमांक मिळवला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालाच्या म्याडमला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.स्वा. सावरकर नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवारी रात्री झाले. यावेळी प्रमुख पाहुणे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते राजेश देशपांडे यांनी सांगितले की, नाटक जगले तरच मालिका जगणार आहे. नट कितीही मोठा झाला तरी नाटक, एकांकिकेतून स्वत:ची परीक्षा घेण्याची गरज असते. आम्हीसुद्धा हे करतो.

मुंबईत मानाचि संस्थेमार्फत आम्ही ४०० लेखकांना एकत्र केले आहे. रत्नागिरीतही लेखनाची कार्यशाळा घेणार असल्याचे सांगितले. सध्या टी. व्ही. मालिकांमुळे सुपारीस्टार वाढत आहेत. मालिका जगण्यासाठी हे नक्कीच उपयोगी आहे, मात्र नाटक, एकांकिकांमधून वषार्नुवर्षे टिकणारे कलाकार निर्माण होतात. लेखक हा शेतकरी आहे. मात्र, ज्या देशात लेखक, शेतकऱ्यांवर अन्याय होतो, त्या देशाचे भवितव्य उज्ज्वल नसतं, अशी टीकाही त्यांनी केली.एकांकिका स्पर्धेतील बक्षीसपुरुष अभिनय- यशोधन गडकरी (तो, तेरे मेरे सपने), पराग फडके (घिस्सू, अफू), स्वप्नील धनावडे (नंदू, अर्थवार्म, रसिक रंगभूमी, रत्नागिरी), स्त्री अभिनय- कविता गडकरी (ती, तेरे मेरे सपने), स्नेहल महाडिक (सारा, सॉल्व्हड वन डिव्हायडेड बाय टू इज इक्वल, क्रिएटिव्ह कार्टी, मुंबई), सायली जोशी (कोराओ, इव्होल्युशन अ क्वेश्चन मार्क), लक्ष्यवेधी भूमिका- आर्यन कासारे (बनी तो बनी, संस्कृती फाऊंडेशन, लांजा). दिग्दर्शन - साबा राऊळ (इव्होल्युशन अ क्वेश्चन मार्क), यशोधन गडकरी (तेरे मेरे), अनिरुद्ध दांडेकर (अफू), नेपथ्य - केतकी, अभिषेक (तेरे मेरे), अनिकेत विचारे (इव्होल्युशन), राजेश, चेतन व विशाल (म्याडम), पार्श्वसंगीत - नादश्री व अभिमन्यू (तेरे मेरे सपने), अक्षय व गौरव (म्याडम), कश्मिरा सावंत (अल्पविराम, कलारंग रत्नागिरी), प्रकाशयोजना - सुप्रभात व निर्मला (तेरे मेरे सपने), अनिरुद्ध दांडेकर (अफू), शुभम व अक्षय (म्याडम). लेखन - इरफान मुजावर (तेरे मेरे सपने), प्राजक्ता देशमुख (अफू). स्टार थिएटर्सतर्फे स्व. आनंद प्रभुदेसाई स्मृती विनोदी अभिनय - विशाल जाधव (मल्टीप्लस आम्ही कलाकार, भार्इंदर). विजयकुमार नाईक, संजय बोरकर व आनंद म्हसवेकर यांनी परीक्षण केले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिक