मुंबई विद्यापीठात गाजली देवरुखच्या विलास राहाटेची रांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:56+5:302021-09-02T05:08:56+5:30
देवरुख : विज्ञान, कला, सांस्कृतिक, क्रीडा, ग्रंथसंपदा आणि आणि पदवीचा वेश याबरोबरच मुबंई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरची प्रतिकृती रांगोळीव्दारे चितारणाऱ्या ...

मुंबई विद्यापीठात गाजली देवरुखच्या विलास राहाटेची रांगोळी
देवरुख : विज्ञान, कला, सांस्कृतिक, क्रीडा, ग्रंथसंपदा आणि आणि पदवीचा वेश याबरोबरच मुबंई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरची प्रतिकृती रांगोळीव्दारे चितारणाऱ्या देवरुखच्या विलास विजय रहाटे याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. निमित्त होते विद्यापीठाच्या राष्ट्रीय मूल्यांकनाचे. यादरम्यान त्याच्या रांगोळीची मोठी चर्चा होती.
मुंबई विद्यापीठातील नॅकच्या तपासणी दरम्यान आठल्ये-सप्रे -पित्रे महाविद्यालय, देवरुखचा माजी विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय युवा महोत्सव संघातील यशस्वी कलाकार म्हणून ज्याने ठसा उमटविला तो विलास विजय रहाटे याला रांगोळी काढण्याचा बहुमान मिळाला होता. त्याने मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या तालुक्याबरोबरच महाविद्यालयाचा नावलौकिक निर्माण केला आहे.
विद्यापीठाच्या फोर्ट व कलिना कॅम्पस प्रवेशद्वारापाशी त्याने चितारलेली रांगोळी चित्ताकर्षक ठरली. त्याच्या या कलेचे कौतुक अनेक मान्यवरांकडून करण्यात आले. विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि हाच राजाबाई टॉवर विलासने रांगोळीतून हुबेहूब साकारली होता. सोबतच दुसऱ्या रांगोळीत विद्यापीठाचे भावविश्वच त्याने उलघडून दाखविले होते. त्याच्या या कलेला आणि कल्पनाशक्तीला अनेक रसिकांनी दाद दिली.
010921\20210901_165142.jpg~010921\20210901_165217.jpg~010921\20210901_165237.jpg
रांगोळी विलास रहाते~रांगोळी~विलास रहाते