रंगनाथन जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST2021-08-15T04:32:24+5:302021-08-15T04:32:24+5:30
मंडणगड : येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. ...

रंगनाथन जयंती
मंडणगड : येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक साळुंखे होते. कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला.
रक्तदान शिबिर
खेड : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान रत्नागिरी जिल्हा अंतर्गत खेड तालुक्याच्या वतीने रविवार, १५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येथील नगर परिषद सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर होणार आहे.
संघटनेचे उपोषण
राजापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कारभारावर आक्षेप घेत शिक्षण क्रांती संघटनेने १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ महत्त्वाच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, जिल्हा शाखा रविवारी रत्नागिरीतील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहे.
रानभाज्यांची विक्रमी विक्री
रत्नागिरी : येथील कृषी विभागामार्फत नजीकच्या पोमेंडी नर्सरीत रानभाज्या प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यात टाकळा, रताळी, काकवी, बांबू, घोळ, गुळवेल, करटोली, अंबाडी आदी ३५ रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात अनेक रानभाज्यांची खरेदी नागरिकांनी केली.
सैनिकांना राख्या
दापोली : येथील न. का. वराडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ विभागातर्फे सैनिकांसाठी राख्या पाठविण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या विद्यालयाकडून राख्या पाठविण्यात आल्या असून, प्राचार्य डॉ. सुरेख निंबाळकर यांच्याकडे त्या सुपुर्द करण्यात आल्या आहेत.