राणेंना काँग्रेसने सडवले, आता भाजपा कुजवणार - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:45 IST2017-10-08T00:45:26+5:302017-10-08T00:45:49+5:30

गेली बारा वर्षे नारायण राणे यांना काँग्रेसवाल्यांनी सडवले. आता त्यांना भाजपावाले कुजवतील, असा टोला शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मारला.

Raneena Congress annihilate, BJP will now get rid of - Subhash Desai | राणेंना काँग्रेसने सडवले, आता भाजपा कुजवणार - सुभाष देसाई

राणेंना काँग्रेसने सडवले, आता भाजपा कुजवणार - सुभाष देसाई

रत्नागिरी : गेली बारा वर्षे नारायण राणे यांना काँग्रेसवाल्यांनी सडवले. आता त्यांना भाजपावाले कुजवतील, असा टोला शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मारला. सत्तेसमोर झुकणाºया राणे यांचा स्वाभिमान गेला कुठे, असा प्रश्नही त्यांनी केला.
शनिवारी रत्नागिरीत शिवसेना पदाधिकाºयांचा मेळावा झाला. देसाई म्हणाले की, ज्या राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा नाही, त्यांनी भाजपाला मिठी मारली. जो पक्ष सत्तेत आहे, त्याच्यापुढे लोटांगण घ्यायचे, हे त्यांचे कामच आहे. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान नावाचा पक्ष काढला. त्यांचा स्वाभिमान कुठे आहे? निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वाभिमान हा पक्ष नोंदणीसाठी देण्यात आला आहे. आयोगाने राणे यांच्या स्वाभिमानाबाबत विचार करावा, असा टोलाही त्यांनी मारला.
शिवसेनाप्रमुखांनी राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढले. त्यांच्याबरोबर १० आमदारांनीही शिवसेना सोडली होती. आज ते आहेत कुठे, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला.

Web Title: Raneena Congress annihilate, BJP will now get rid of - Subhash Desai