शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: श्वानाच्या मागे धावला अन् बिबट्या बाथरूमात अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:29 IST

बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यामध्ये घेतले. त्यानंतर कुत्राही सुरक्षित बाथरूममधून बाहेर आला.

देवरुख : श्वानाचा पाठलाग करण्याच्या नादात बिबट्या बाथरूममध्ये शिरला आणि अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात बंदिस्त झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द गावनवाडी येथे सोमवार २५ रोजी पहाटे घडली आहे. तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द येथील ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांचे राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये हा प्रकार घडला.वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश भालेकर यांच्या घराच्या मागील बाजूस सोमवारी पहाटे साडेचार वाजता श्वानाचा पाठलाग करताना बिबट्या बाथरूममध्ये अडकला. ही माहिती कुंभारखाणी खुर्दचे पोलिस पाटील रवींद्र महाडिक यांनी वन विभागाला दिली. वनपाल यांनी घटनास्थळी जाऊन जाऊन खात्री केली. यावेळी बाथरूममध्ये कुत्रा व बिबट अडकला असल्याचे दिसले. यावेळी वन विभागाने बाथरूमच्या दरवाजावरील बाजू लाकडी फळ्या लावून बंद केली आणि दारासमोर पिंजरा लावला. बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यामध्ये घेतले. त्यानंतर कुत्राही सुरक्षित बाथरूममधून बाहेर आला.या बिबट्याची कडवईचे पशुधन विकास अधिकारी सूर्यकांत बेलुरे यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. हा बिबट नर असून, वय आठ ते नऊ वर्षांचा आहे. त्याची पूर्ण वाढ झाली असून, तो तंदुरुस्त असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.यावेळी घटनास्थळी रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, संगमेश्वर देवरुखचे न्हानू गावडे, वनरक्षक फुणगूस आकाश कडूकर वनरक्षक साखरपा सहयोग कराडे, वनरक्षक दाभोळे सुप्रिया काळे, वनरक्षक आरवली सुरज तेली, वनरक्षक जाकादेवी शर्वरी कदम, पोलिस पाटील रवींद्र महाडिक व ग्रामस्थ उपस्थित होते. विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी चिपळूण) गिरिजा देसाई तसेच सहायक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.