राष्ट्रवादीच्या बैठकीला रमेश कदमांची उपस्थिती
By Admin | Updated: July 22, 2016 15:48 IST2016-07-20T23:06:13+5:302016-07-22T15:48:56+5:30
बारावीनंतर कोकण कृषी विद्यापीठात घेतली फॉरेस्ट्री पदवी.
राष्ट्रवादीच्या बैठकीला रमेश कदमांची उपस्थिती
चिपळूण : गोविंदराव निकम सभागृहात दि. २४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी सावर्डे येथे बैठक आयोजित केली आहे, या बैठकीला माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम उपस्थित राहणार आहेत. बैठकीत कदम कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिपळूण नगर परिषदेबरोबरच जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता पक्षाची स्पष्ट भूमिका ठरवण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी, माजी मंत्री, आमदार भास्कर जाधव, पदवीधर मतदार संघाचे आमदार वसंत डावखरे, दापोलीचे आमदार संजय कदम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, पक्षनिरीक्षक संदेश कोंडविलकर, प्रदेश चिटणीस बाबाजी जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष निकम यांनी हालचाली सुरु केल्या असून, आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना खास पत्राद्वारे निमंत्रण पाठविण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असून, तालुक्याची जबाबदारी त्या त्या तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हातात सोपवली जाणार आहे.
सावर्डे येथे यापूर्वी झालेल्या जिल्हा प्रभारी आमदार जाधव यांच्या बैठकीकडे माजी आमदार रमेश कदम यांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर झालेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्यालाही कदम अनुपस्थित होते. कदम यांच्याबाबत भूमिका समजून घ्यावी व त्यांना सक्रिय करावे, यासाठी या मेळाव्यात काही नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याचदरम्यान कदम यांनी स्वतंत्र मेळावा घेण्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे कदम विरुध्द जिल्ह्यातील राष्ट्रवादी असे एक चित्र निर्माण झाले होते.
कदम कोणती भूमिका घेतात, याबाबत कार्यकर्त्याना अद्याप उत्सुकता आहे. आता सावर्डे येथील बैठकीला माजी आमदार कदम उपस्थित राहणार असल्याचे संकेत प्राप्त झाल्याने कदम यांचा स्वतंत्र मेळावा होणार का? याबाबत संभ्रम आहे. सावर्डेच्या भूमिकेत कदम यांची नक्की काय भूमिका असेल, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)
बारावीनंतर कोकण कृषी विद्यापीठात घेतली फॉरेस्ट्री पदवी.
फर्निचर वापरापूर्वीच्या प्रक्रिया, परदेशी निर्यात, दर्जाबाबत दोन वर्षांचा अभ्यास पूर्ण.
जयपूर येथील कंपनीचे सहा राज्यात कामकाज सुरु.
लाकूड अविरत उपलब्ध होण्यासाठी संशोधन सुरू.