रमेश कदम यांचा अखेर राष्ट्रवादीत पुनर्प्रवेश
By Admin | Updated: July 24, 2014 23:28 IST2014-07-24T23:20:13+5:302014-07-24T23:28:24+5:30
स्वगृही परतले : प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्र्यांकडून जोरदार स्वागत; भास्कर जाधव गैरहजर

रमेश कदम यांचा अखेर राष्ट्रवादीत पुनर्प्रवेश
चिपळूण : येथील माजी आमदार रमेश कदम यांनी आज (गुरुवारी) राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पुनर्प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादीचे कोकण प्रभारी बाबाजी जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरविंद आंब्रे, चिपळूणचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा जाधव, सदस्य अजय बिरवटकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कमाल बेबल, महिला आघाडी तालुकाध्यक्ष चित्रा चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
आता चांगल्या पध्दतीने काम करुन जिल्ह्यात सर्व ताकदीने लढू व यश मिळवू. रमेश कदम पक्ष सोडून गेल्याची सल पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मनात होती. त्यांनीच आग्रह धरल्याने हा कार्यक्रम येथे होत आहे. कदम परत पक्षात आल्याने पक्षाची ताकद वाढेल, असे पवार यांनी सांगितले. झाल्या चुकीबद्दल माफी मागून कदम यांनी जोमाने काम करण्याची ग्वाही दिली. (प्रतिनिधी)