शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

रमेश कदम यांची भाजपला सोडचिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 22:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचिपळूण : भारतीय जनता पक्षात जाऊन आठ महिने झाले. पण आपल्यावर कोणतेही काम सोपवले नाही की कोणतीही जबाबदारी दिली नाही. पक्ष प्रवेशानंतर केवळ बसवून ठेवले आहे. आपली किंमतच नसेल तर या पक्षात राहून तरी काय करणार? शिवाय आपण पक्षाचा साधा सदस्यही नसल्याने आपण भाजपमुक्त होत आहोत, अशी घोषणा ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिपळूण : भारतीय जनता पक्षात जाऊन आठ महिने झाले. पण आपल्यावर कोणतेही काम सोपवले नाही की कोणतीही जबाबदारी दिली नाही. पक्ष प्रवेशानंतर केवळ बसवून ठेवले आहे. आपली किंमतच नसेल तर या पक्षात राहून तरी काय करणार? शिवाय आपण पक्षाचा साधा सदस्यही नसल्याने आपण भाजपमुक्त होत आहोत, अशी घोषणा माजी आमदार रमेश कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. पुढील प्रवासाची दिशा आपण कार्यकर्त्यांशी बोलून निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आठ महिन्यांपूर्वी नगर परिषद निवडणुकीनंतर माजी आमदार कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादांना कंटाळून त्यांनी पक्ष सोडला होता.मुख्यमंत्री फडणवीस व भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी त्यावेळी आपल्याला दिलेला शब्द पाळलेला नाही. शिवाय पक्षाची कोणतीही जबाबदारी आपल्याला दिली नसल्याने केवळ स्वस्थ बसणे आपल्याला मान्य नाही. आपण सतत कार्यरत राहणारा कार्यकर्ता असल्याने केवळ बघत राहणे योग्य वाटत नाही. त्यामुळे आपण आता भाजपशी फारकत घेऊन कार्यकर्त्यांबरोबर काम करणार आहोत. आपण लवकरच कार्यकर्त्यांचा व हितचिंतकांचा मेळावाघेऊन कार्यकर्ते सांगतील त्यानुसार आपली पुढची दिशा ठरवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.आपण कोणत्या पक्षात जाणार याबाबत आजतरी निश्चित निर्णय नसला तरी कार्यकर्ते सांगतील तो निर्णय घेऊ, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. कार्यकर्त्यांनी घरात बसायला सांगितले तरी त्यालाही आपली तयारी आहे. १९९९ पासून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होतो. चिपळूण तालुक्यात व जिल्ह्यात आपण पक्ष रुजवला. परंतु, त्या पक्षानेही आपल्याला पाठबळ दिले नाही. म्हणून आपण भारतीय जनता पक्षात गेलो होतो. पण तेथेही भ्रमनिरास झाला. म्हणून आपण हा पक्ष सोडत आहोत, असे त्यांनी सांगितले.कदम यांनी यावेळी भाजपची सत्ता असलेल्या चिपळूण नगर परिषदेच्या कारभारावर जोरदार टीका केली. भ्रष्टाचाराचे आरोप केले. येथे सर्वसामान्य लोकांची कामे होत नसतील आणि विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार होणार असेल, तर भविष्यात आपण आक्रमक होऊन पावले उचलू. नगर परिषदेत चार नगरसेवकांचा आपला स्वतंत्र गट आहे. सध्या हा गट भाजपबरोबर सत्तेत असला तरी इथून पुढे आमचा सत्तेशी संबंध राहणार नाही. शहर विकासाचा जो मुद्दा येईल त्याला आमचा पाठिंबा राहील. सामान्य माणसाच्या हितासाठी आम्ही जबाबदारीने काम करू. परंतु, त्यांच्या (भाजपच्या) पापाचे धनी आमचे नगरसेवक होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.प्रभाग क्र.९ च्या पोटनिवडणुकीत चुकीच्या पद्धतीने उमेदवाराची निवड करण्यात आली. आपण काम केलेल्या आतापर्यंतच्या सर्व पक्षात इच्छुक उमेदवारांना एकत्र बसवून त्यांची मुलाखत घेऊनच उमेदवाराची निवड होत होती. परंतु, येथे इच्छुकांना डावलून उमेदवार निवड झाली. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. आठ महिने आपण नगर परिषदेत पाऊल ठेवले नाही किंवा नगराध्यक्षांना साधा फोनही केला नाही. नगरपरिषदेत काम करण्यासाठी आपल्याला कोणाची गरज नाही. आजही प्रशासनावर आपला तेवढा अंकुश असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी माजी नगराध्यक्ष सावित्री होमकळस, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, रोशन दलवाई, माजी नगरसेवक संजय तांबडे, माजी नगरसेवक रमेश खळे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.चौकट करणेनगरपरिषदेवर आरोपनगरपरिषदेत नागरिकांच्या विधायक कामाकडे कोणी लक्ष देत नाही. आपण ग्रॅव्हिटीने पाणी योजनेसाठी प्रयत्न केले. परंतु, आता त्याकडे कोणाचे लक्ष नाही. जुन्या मंजूर कामांचा पाठपुरावा केला जात नाही. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अद्यापही बंद आहे. तसेच एलईडीचे दर ३५ टक्क्यांनी उतरल्यामुळे फेरनिविदा काढावी, असे जुन्या कार्यकारिणीने ठरविले होते. परंतु, आता १० टक्के वाढीव म्हणजेच ४५ टक्के वाढीव दराची निविदा मंजूर झाली आहे. हा भार जनतेवर येणार आहे. भुयारी गटार योजनेचे ९० कोटीचे अंदाजपत्रक तयार झाले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कोणतेही पत्र नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आराखड्यात चिपळूण शहराचे नाव नाही. असे असताना या अंदाजपत्रकासाठी सर्वेक्षण करताना नगर परिषदेचा ५ टक्के खर्च झाला. ९० कोटींच्या ५ टक्क्यांचा विचार केला तर जी गोष्ट होणारच नव्हती त्याचे सर्वेक्षण कशाला? असे प्रश्न त्यांनी केले.