शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

महाविकास आघाडीच्या सभेत व्यासपीठावरच नाराजी नाट्य; अनंत गिते यांचे भाषण भास्कर जाधव यांनी थांबवले

By मनोज मुळ्ये | Updated: April 25, 2024 21:49 IST

या विषयाची जोरदार चर्चा झाली. केवळ रत्नागिरी जिल्हाच नाही तर रायगड जिल्ह्यातही हा विषय वाऱ्यासारखा पसरला.

लोकमत न्यूज नेटवर्क, गुहागर : महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते आणि आमदार भास्कर जाधव यांचे छोट्याशा विषयावरून नाराजी नाट्य झाल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील पालपेणे येथे झाला. अनंत गीते यांचे भाषण भास्कर जाधव यांनी मध्येच थांबवल्याने गिते नाराज झाले आणि ज्या मुद्यासाठी भास्कर जाधव यांनी भाषण थांबवले तो मुद्दा गिते यांनी पुढे सुरूच ठेवल्याने भास्कर जाधवही नाराज झाले. त्यामुळे या विषयाची जोरदार चर्चा झाली. केवळ रत्नागिरी जिल्हाच नाही तर रायगड जिल्ह्यातही हा विषय वाऱ्यासारखा पसरला.

अंजनवेल गटाची महाविकास आघाडीची सभा पालपेणे भवानी सभागृहात सुरू होती. अनंत गिते यांनी भाषणाची सुरुवात करतानाच, मागील लोकसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघात मी भास्कर जाधव यांच्याविरोधात लढलो, असे उद्गार काढले. हे वाक्य ऐकताच ‘सॉरी सॉरी गिते साहेब’ असे म्हणत आमदार जाधव उठून उभे राहिले. मला असे वाटते की हे बोलणं आता टाळलं पाहिजे. या वाक्याचा वेगळा अर्थ लावून प्रचार केला जातोय. मी राष्ट्रवादीत होतो, म्हणून तटकरे यांच्या बाजूने होतो. मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही, असे गिते यांना सांगून आमदार जाधव खाली बसले.

तरीही माझे पुढचे वाक्य आपण ऐकावे, असे गिते यांनी सांगितल्यावर आपल्या प्रत्येक सभेतील भाषणे मी ऐकली आहेत, असे सांगत आमदार जाधव यांनी मान फिरवत नाराजी व्यक्त केली. यावेळी अनंत गिते यांचाही चेहरा पडला. परंतु, प्रचार सभा असल्याने त्यांनी विषय बदलत भाषणाला सुरुवात केली.या सभेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख सचिन बाईत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इक्बाल घारे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर उपस्थित होते.

भोजनालाही थांबले नाहीत

ही सभा संपल्यावर आमदार जाधव यांनी अनंत गिते आणि त्यांच्यासोबत असलेले जिल्हाप्रमुख सचिन कदम, नित्यानंद भागवत यांना जेवायला येण्याचा निरोप दिला. मात्र, अनंत गिते यांनी वेळणेश्वरच्या सभेसाठी पुढे जातो, असा उलटा निरोप दिला आणि ते जेवण्यासाठी थांबले नाहीत.

टॅग्स :ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गAnant Geeteअनंत गीतेBhaskar Jadhavभास्कर जाधवShiv Senaशिवसेनाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४