विद्याभारती प्राथमिक विभागात रक्षाबंधन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST2021-08-24T04:35:34+5:302021-08-24T04:35:34+5:30
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित सोहनी विद्यामंदिरमधील विद्याभारती प्राथमिक विभागामध्ये ऑनलाईन रक्षाबंधन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात ...

विद्याभारती प्राथमिक विभागात रक्षाबंधन सोहळा
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित सोहनी विद्यामंदिरमधील विद्याभारती प्राथमिक विभागामध्ये ऑनलाईन रक्षाबंधन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात जान्हवी पवार व साक्षी शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. रमेश नवरत यांनी प्रास्ताविकातून नारळी पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. उमेश रेवाळे यांनी वृक्षांना राखी बांधून वृक्षसंवर्धन व संरक्षण कृतीद्वारे पटवून दिले. यावेळी संध्या रेवाळे यांनी शिक्षकांच्या मणिबंधावर राखी बांधून बहीण-भावाच्या ओवाळणीचे दृश्य चित्र साकारले.
कलाशिक्षक अभिषेक बुरटे यांनी राख्यांचे विविध प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेतले. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ‘घेऊ आस्वाद खाऊ-गात, आम्ही बनवलेला नारळी भात’ असा इयत्तानिहाय कृतिदर्शक उपक्रम दिला गेला. अस्मिता भांबिड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व संस्थाचालक व मुख्याध्यापक अनिल शेठ यांनी शुभेच्छा दिल्या.