शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या शिक्षण विभागात खडखडाट, अधिकारीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:23 IST

राज्यात शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाचा अक्षरश खेळखंडोबा सुरू आहे. राज्य शासनाने नुकत्याच (शिक्षण सेवा वर्ग १) शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये जिल्ह्यात असणाºया एकमेव शिक्षणाधिकाºयांची बदली करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या शिक्षण विभागात खडखडाट, अधिकारीच नाहीत शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; देवीदास कुलाळ यांचीही बदली

रत्नागिरी / टेंभ्ये : राज्यात शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाचा अक्षरश खेळखंडोबा सुरू आहे. राज्य शासनाने नुकत्याच (शिक्षण सेवा वर्ग १) शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये जिल्ह्यात असणाऱ्या एकमेव शिक्षणाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.देविदास कुलाळ यांच्याकडे सध्या प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागांचा कार्यभार आहे. असे असताना नवीन आदेशानुसार कुलाळ यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या सहसचिवपदी बदली करण्यात आली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात एकही शिक्षणाधिकारी कार्यरत नाहीत. तसेच १३पैकी वर्ग दोनचे केवळ एक अधिकारी कार्यरत असून, ते देखील ३० जूनला सेवानिवृत्त होत आहेत.दहावी व बारावीच्या निकालामध्ये गेली अनेक वर्षे राज्यात अव्वल असणाºया कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याकडे राज्य शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. राज्य शासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार रत्नागिरीमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक विभागाची जबाबदारी सांभाळणारे शिक्षणाधिकारी कुलाळ यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

यामुळे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच प्राथमिक शिक्षणाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत. सध्या जिल्ह्यात शिक्षण सेवा वर्ग दोनचे एकमेव पद कार्यरत आहे. लांजा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई हे ३० जूनला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये वर्ग दोनचे एकही पद कार्यरत राहणार नाही. 

रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं अधिकाऱ्यांची कमतरता पाहायला मिळते. शिक्षण क्षेत्रात ती जास्त प्रमाणात जाणवत आहे. सर्व अधिकारी कार्यरत असणे अशी स्थिती रत्नागिरीमध्ये कधीही पाहायला मिळालेली नाही . शैक्षणिक धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी वर्ग महत्त्वाचा आहे. राज्य संघटनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची कमतरता शासनाच्या निदर्शनास आणून देणार येणार आहोत.-भारत घुले,उपाध्यक्ष, महाराष्ट्र माध्यमिक अध्यापक संघ 

जिल्ह्यामध्ये एकही शिक्षणाधिकारी कार्यरत नसणे ही बाब अत्यंत दयनीय आहे. जिल्ह्यांमधील सर्व अधिकाºयांची पदे भरण्याबाबत जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करणार आहोत.-विजय पाटील,अध्यक्ष, मुख्याध्योपक संघ, रत्नागिरी

टॅग्स :TransferबदलीTeacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी