शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टातून १२ हजार भाऊरायांपर्यंत पाेहोचल्या राख्या; महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही रत्नागिरीतून रवाना

By शोभना कांबळे | Updated: August 30, 2023 17:07 IST

शाेभना कांबळे रत्नागिरी : भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ करणाऱ्या, त्यांच्या नात्यातील गोडवा अधिक वाढविणाऱ्या, आवडत्या रक्षाबंधन सणासाठी जिल्ह्यातील बहिणींनी ...

शाेभना कांबळेरत्नागिरी : भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ करणाऱ्या, त्यांच्या नात्यातील गोडवा अधिक वाढविणाऱ्या, आवडत्या रक्षाबंधन सणासाठी जिल्ह्यातील बहिणींनी रत्नागिरी टपाल कार्यालयावर विश्वास टाकत तब्बल आपल्या १२ हजार भाऊरायांपर्यंत राख्या पोहोच केल्या आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांमध्ये पोस्टाच्या आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफ्यामधून या राख्या पाठविण्यात आल्या आहेत.रत्नागिरी विभागाने जिल्ह्यासाठी ३ हजार विशेष अशा आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफ्यांची मागणी केली होती. हे आकर्षक, वाॅटरप्रूफ लिफाफे केवळ दहा रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले होते. पोस्टाच्या सर्व कार्यालयात हे लिफाफे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. गतवर्षीही पोस्टाच्या या आकर्षक लिफाफ्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता.एका लिफाफ्यात मोठ्या दोन आणि लहान तीन ते चार राख्या राहू शकतील अशा प्रकारे हे आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफे मागविण्यात आले होते. टपाल खात्याने तब्बल २१ दिवस आधी हे लिफाफे उपलब्ध करून दिले असल्याने या राख्या पाठविण्यासाठी बहिणींना मुबलक वेळ मिळाला. या राख्यांच्या मेल बॅगेला वेगळे लेबल लावले होते. त्यामुळे वितरण करताना राख्यांच्या बॅगा अधिक सुरक्षितरीत्या पोहोच झाल्या.

गेल्या वर्षी २९९० एवढ्या राख्या रत्नागिरी जिल्ह्यातून रवाना झाल्या होत्या. हे लक्षात घेऊन येथील पोस्ट कार्यालयाने यंदा ३००० विशेष लिफाफ्यांची मागणी केली हाेती. यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, साध्या दोन हजार पाकिटांतूनही नागपूर, सोलापूर, अमरावती, कुडाळ, पुणे, कोल्हापूर, सातारा, मिरज, मुंबई आणि गोवा राज्यातही राख्या पाठविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्येही तब्बल सात हजार राख्या पोस्टाच्या माध्यमातून पाठविण्यात आल्या आहेत. यंदाही पोस्टाने बहिणींच्या राख्या वेळेवर पोहोच केल्या आहेत.

पोस्टाची हायटेक सेवा आता सर्वदूरस्वातंत्र्यपूर्व काळापासून सामान्य नागरिकांशी जोडलेली पोस्टाची नाळ अजूनही कायम आहे. आधुनिक काळानुसार पोस्ट विभागही आता हायटेक झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने ग्राहकांना जलद सेवा मिळत आहे. पोस्टाच्या सर्व सेवांना पसंतीही मिळत आहे.

रक्षाबंधनासाठी रत्त्नागिरी जिल्ह्यातून राख्या पाठविणाऱ्या भगिनींची संख्या जास्त आहे, हे लक्षात घेऊन यंदाही आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफे मागविले हाेते. मात्र, या लिफाफ्यांबरोबरच साध्या लिफाफ्यातून मिळून बारा हजार राख्या महाराष्ट्रासह गोवा आणि अन्य राज्यांत पोहोचल्या आहेत. - नंदकुमार कुरळपकर, डाकघर अधीक्षक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPost Officeपोस्ट ऑफिसRaksha Bandhanरक्षाबंधन