क्रेडाई चिपळूण पदग्रहण सोहळा अध्यक्षपदी राजेश वाजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST2021-04-16T04:31:03+5:302021-04-16T04:31:03+5:30

चिपळूण : क्रेडाई चिपळूणच्या अध्यक्षपदी राजेश वाजे, तर सचिवपदी संतोष तडसरे व ट्रेझरर समीर मेमन यांची सर्वानुमते ...

Rajesh Waje presided over the inauguration ceremony of Credai Chiplun | क्रेडाई चिपळूण पदग्रहण सोहळा अध्यक्षपदी राजेश वाजे

क्रेडाई चिपळूण पदग्रहण सोहळा अध्यक्षपदी राजेश वाजे

चिपळूण : क्रेडाई चिपळूणच्या अध्यक्षपदी राजेश वाजे, तर सचिवपदी संतोष तडसरे व ट्रेझरर समीर मेमन यांची सर्वानुमते निवड झाली.

क्रेडाई कार्यालयात सन २०२१ - २०२३ कार्यकाळासाठी निवड झालेल्या अध्यक्ष व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मावळते अध्यक्ष जावेद दलवाई यांनी त्यांच्या अध्यक्षीय दोन वर्षांच्या कार्यकाळामधील झालेल्या महत्त्वपूर्ण कामांचा आढावा घेतला. त्यानंतर मावळते ट्रेझरर शकील चौगले यांनी संपूर्ण दोन वर्षांतील आर्थिक लेखाजोखा मांडला.

चिपळूणमध्ये ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक व क्रेडाई महाराष्ट्राचे सल्लागार विनय काळी यांच्या मार्गदर्शनाखाली मावळते अध्यक्ष जावेद दलवाई यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश वाजे यांच्याकडे पदभार सोपवला. तसेच क्रेडाई, चिपळूणचे माजी अध्यक्ष श्यामकांत कदम व ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक इक्बाल अरकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळते ट्रेझर शकील चौगले यांनी नवनिर्वाचित सचिव संतोष तडसरे व नवनिर्वाचित ट्रेझरर समीर मेमन यांच्याकडे पदभार सोपवला. या कार्यक्रमाला बांधकाम व्यावसायिक प्रवीण पटेल, रवींद्र करंदीकर, नगरसेवक राजेश केळसकर, प्रसाद खातू, मन्सूर देसाई, राहुल काळी, मनोज गायकर, गुरुप्रसाद सोहनी, प्रकाश देसाई उपस्थित होते.

Web Title: Rajesh Waje presided over the inauguration ceremony of Credai Chiplun