शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरच्या शाही पराठयाचा डंका महाराष्ट्रासह गुजराथ, कर्नाटक आणि गोव्यातही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 11:15 IST

राजापूर तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बंधूंची बेकरी व्यवसाय ते शाही पराठा उद्योगात यशस्वी वाटचाल

विनोद पवार 

राजापूर : कोणताही व्यवसाय असो तो करण्याची जिद्द, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा व सचोटीची जोड मिळाली तर तो यशस्वी होऊ शकतो, हे राजापूर तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बंधूंच्या बेकरी व्यवसाय ते शाही पराठा उद्योगाच्या यशस्वी वाटचालीकडे पाहिल्यावर लक्षात येते.शाही पराठयाच्या माध्यमातुन मैदा, गहू, मेथी असे तीन प्रकारचे पराठा तसेच पुरी आणि पुरणपोळीच्या उत्पादनातुन साखरकर बंधूंनी राजापूरचे आणि डोंगर गावचे नाव संपुर्ण महाराष्ट्राबरोबरच गुजराथ, कर्नाटक आणि गोव्या पर्यंत पोहचविले आहे. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाचा डंका महाराष्ट्राबाहेरा बाहेरही होत आहे.तर साखरकरांच्या या पराठयाची भुरळ परदेशात राहणाऱ्यांनाही पडली असून अनेक जण जिथे मिळेल तेथून हे शाही पराठे, पुरी आणि पुरणपोळी परदेशात घेऊन जात आहेत. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाने सातासमुद्रापार धडक दिली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता लवकरच साखरकर बंधू या शाही पराठयाच्या माध्यमातुन मलबार लच्चा पराठयाचे उत्पादन करणार आहेत. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाची चव चाखणाऱ्यांना आता या नव्या मलबार लच्चा पराठयाची चव चाखता येणार आहे.साखरकर बंधुंच्या या शाही पराठयाच्या उत्पादनामुळे राजापूरची आणखी एक नवी ओळख उद्योग व्यवसायत निर्माण होत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातुन साखरकर यांनी डोंगर, गोवळ, विल्ये भागातील ३० महिलांसह दोन पुरूष अशा ३२ जणांना प्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून दिला असून दररोज सुमारे अडीच टन इतके या वस्तुंचे उत्पादन होत आहे. आता साखरकरांची तिसरी पीढीही या व्यवसाय काम करत असून साखरकर परिवाराचे सिराज साखरकर व शरफुद्दीन साखरकर या दोन बंधूंबरोबर सिराज साखरकर यांचे सुपुत्र नवीन साखरकर हे या व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत. १९९८-९९ साली बेकरी उत्पादनाला सुरूवात डोंगर गावचे साखरकर कुटुंबीय हे एक हे एक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कुटुंबीय आहे. सन १९९८-९९ साली साखरकर यांनी साखरकर बेकर्स या नावाने बेकरी उत्पादनाला सुरूवात केली. मात्र राजापूर शहर आणि तालुका परिसरात वेगळं काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या आणि ध्यास घेतलेल्या साखरकर बंधूंनी दहा वर्षापुर्वी बेकरी व्यवसायातुन या पराठा व्यवसायात पदार्पण केले.परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध या व्यवसायाच्या माध्यमातुन साखरकर यांनी या परिसरातील ३० महिला व दोन पुरूष अशा ३२ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अगदी यंत्राद्वारे पिठ मळण्यापासून ते पॅकिंग आणि आर्डर पाठविण्यापर्यंत सर्व कामे या महिला करत आहेत. कोरोना काळात लॉकडाऊमध्येही चांगल्या प्रकारे उत्पादन व विक्री सुरू होती. ग्रामीण भागातील गरजू महिलांना या व्यवसायाच्या माध्यमातुन आर्थिक शक्ती मिळाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी