राजापुरात चिठ्ठी शिवसेनेला पावली
By Admin | Updated: September 15, 2014 00:02 IST2014-09-14T23:25:45+5:302014-09-15T00:02:57+5:30
जिल्ह्यातील उर्वरित आठही तालुक्यांत सभापतीच्या अपेक्षेप्रमाणेच निवडी झाल्या.

राजापुरात चिठ्ठी शिवसेनेला पावली
रत्नागिरी : राजापूर सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत समसमान मतदान झाल्याने अखेर चिठ्ठीचा वापर झाला व त्यामध्ये नशिबाने साथ दिल्याने दोन्ही पदी शिवसेनेचे सदस्य विजयी झाले. जिल्ह्यातील उर्वरित आठही तालुक्यांत सभापतीच्या अपेक्षेप्रमाणेच निवडी झाल्या.
राजापुरात अडीच वर्षे शिवसेनेला साथ दिलेल्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत काँग्रेसशी घरोबा केला. त्यामुळे शिवसेना आणि आघाडी यांच्या सभापती पदाच्या उमेदवारांना प्रत्येकी सहा मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठीचा प्रयोग करण्यात आला. त्यामध्ये शिवसेनेच्या सोनम बावकर यांची सभापतिपदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे उपसभापती निवडीच्यावेळीही हाच गोंधळ झाला आणि त्याहीवेळेस चिठ्ठीचा कौल शिवसेनेला मिळाला. या पदावर उमेश पराडकर यांची वर्णी लागली.
नऊही तालुक्यांत सभापतीच्या निवडी अपेक्षेप्रमाणेच झाल्या. या निवडणुकीत तरुण सभापती होण्याचा मान शिवसेनेच्या दीपाली दळवी यांना मिळाला. त्या लांजाच्या सभापती झाल्या. रत्नागिरीतील सभापतिपदासाठी युतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेनेने या निवडीत चुरस निर्माण केली होती. शिवसेनेतर्फे प्रकाश साळवी यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच रात्री उशिरा नदीम सोलकर यांचे सभापतिपदासाठी शिवसेनेकडून नाव निश्चित केले होते़ मात्र, पुन्हा साळवी यांचे नाव पुढे आले आणि त्यांच्याच गळ्यात सभापतिपदाची माळ पडली. (प्रतिनिधी)
तालुकासभापतीपक्ष
रत्नागिरीप्रकाश साळवीशिवसेना
योगेश पाटीलभाजप
मंडणगडवैशाली चोरगेशिवसेना
आदेश केणेशिवसेना
दापोलीगीतांजली वेदपाठकशिवसेना
उन्मेश राजेशिवसेना
खेडचंद्रकांत कदमशिवसेना
रवींद्र मोरेशिवसेना
गुहागरराजेश बेंडलराष्ट्रवादी
सुरेश सावंतराष्ट्रवादी
चिपळूणसमीक्षा बागवेराष्ट्रवादी
सुचिता पवारराष्ट्रवादी
संगमेश्वरमनीषा गुरवशिवसेना
संतोष डावलशिवसेना
लांजादीपाली दळवीशिवसेना
आदेश आंबोळकरशिवसेना
राजापूरसोनम बावकरशिवसेना
उमेश पराडकरशिवसेना