राजापूर-काजिर्डा वस्तीची गाडी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:40+5:302021-06-30T04:20:40+5:30
पाचल : कोरोना काळात बंद असलेली राजापूर-काजिर्डा ही वस्तीची एसटी गाडी राजापूर आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांनी सुरू केली ...

राजापूर-काजिर्डा वस्तीची गाडी सुरू
पाचल : कोरोना काळात बंद असलेली राजापूर-काजिर्डा ही वस्तीची एसटी गाडी राजापूर आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांनी सुरू केली आहे. ही गाडी सुरू केल्याने पाचल परिसरातील प्रवाशांची गैरसाेय दूर झाली आहे.
राजापूर तालक्यातील काजिर्डा हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, या गावात व परिसरात एसटीशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. त्यामुळे काजिर्डा ही वस्तीची एसटी गाडी सुरू करण्याची आग्रही मागणी गेले आठ ते दिवस सुरू हाेती. काजिर्डा गावचे सरपंच अशोक आर्डे यांनी आगार व्यवस्थापक यांना तसे लेखी पत्र देऊन गाडी सुरू करण्याची मागणीही केली होती. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सौंदळकर, प्रकाश आमकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा पाथरे, राजापूर ग्रामीण पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुरेश गुडेकर यांनीही ही वस्तीची गाडी सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांनी ही गाडी सुरू केली आहे. त्यामुळे कजिर्डा, कोळंब, मूर, वाळवड, तळवडे गावातील तसेच परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.