राजा काजवे यांची भाजप तालुका उपाध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST2021-07-20T04:22:29+5:302021-07-20T04:22:29+5:30

अभिजीत कांबळे यांची अनुसूचित जाति मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती अभिजीत कांबळे यांची अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती ...

Raja Kajve elected as BJP taluka vice president | राजा काजवे यांची भाजप तालुका उपाध्यक्षपदी निवड

राजा काजवे यांची भाजप तालुका उपाध्यक्षपदी निवड

अभिजीत कांबळे यांची अनुसूचित जाति मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती

अभिजीत कांबळे यांची अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत शिवसेनेला दणका देत भाजपामध्ये दाखल झालेल्या सागवेचे राजा काजवे यांची भाजपच्या राजापूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सोमवारी भाजपवासी झालेले गोवळ गावचे सरपंच अभिजीत गणपत कांबळे यांची अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस यापदी नियुक्ती करण्यात आली. ही घोषणा सोमवारी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केली.

राजा काजवे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर कांबळे यांनी सोमवारी भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपकडून त्यांना तत्काळ तालुका व जिल्हा पातळीवर संघटनात्मक कामांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. त्यांच्यावर पक्षाने पक्षवाढीसाठी नवीन जबाबदारी देत त्यांचा सन्मान केला आहे. या निवडीबद्दल त्यांचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका अध्यक्ष अभिजीत गुरव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Raja Kajve elected as BJP taluka vice president