शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उसंत, जगबुडी नदी इशारा पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 14:32 IST

गेले दाेन दिवस खेड तालुक्यातील जगबुडी व राजापूर तालुक्यातील कोदवली या दोन्ही नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते.

रत्नागिरी : गेला आठवडाभर संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारपासूनच कमी झाला आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. राजापूर तालुक्यातील काेदवली नदीचेही पाणी इशारा पातळीच्या खाली आले आहे. मात्र, खेड तालुक्यातील जगबुडी नदीचे पाणी अजूनही इशारा पातळीच्या वर आहे. या नदीची पाणी पातळी ६.२५ मीटर इतकी आहे.जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८:३० वाजता सरासरी ५२.६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात दि. २७ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट घोषित केले असून, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, सोमवारी सकाळी कडकडीत ऊन पडले हाेते. दुपारनंतर सरीवर काेसळणाऱ्या पावसाने सायंकाळी ४ वाजल्यानंतर पुन्हा काेसळण्यास सुरुवात केली. गेले दाेन दिवस खेड तालुक्यातील जगबुडी व राजापूर तालुक्यातील कोदवली या दोन्ही नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते.मात्र, दुपारी काेदवली नदीचे पाणी इशारा पातळीच्या खाली आले. मात्र, जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते. तसेच वाशिष्ठी (चिपळूण), शास्त्री, सोनवी (संगमेश्वर), काजळी, मुचकुंदी (लांजा), बावनदी या सर्व नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. कोयना धरण भरले असून कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.दरम्यान, रायगड येथील दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील सवतसडा आणि अडरे धरणाच्या परिसरात निसर्गप्रेमींना बंदी घालण्यात आली आहे. ६ ऑगस्टपर्यंतही बंदी असणार आहे. याविषयी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले असून, सोमवारी त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfloodपूर