पावसाची विश्रांती; दिवसभर मळभी वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:58+5:302021-09-02T05:06:58+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता; परंतु दिवसभर पावसाने विश्रांती घेतली ...

पावसाची विश्रांती; दिवसभर मळभी वातावरण
रत्नागिरी : जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता; परंतु दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून उन्हाचे दर्शन होत असले तरी मळभी वातावरण कायम होते.
हवामान खात्याने मंगळवारी जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. सोमवारी पावसाचा जोर काहीसा वाढला होता. मात्र, मंगळवारी सकाळपासूनच पावसाने उघडीप दिली होती. पावसाची विश्रांती असली तरी दिवसभर मळभाचे वातावरण होते. सकाळी वातावरणात गारवाही जाणवत होता. पाऊस पडेल असे वाटत होते; परंतु पावसाने दिवसभर विश्रांती घेतली होती. सायंकाळी उन्हाचे दर्शन झाले. पाऊस कमी होताच रत्नागिरीत उकाड्याला सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हा रात्री पावसाची चिन्हे वाटत होती.
सप्टेंबरमध्येही हवामान खात्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे या महिन्यात पावसाचा मुक्काम राहील, असे वाटत आहे.