शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले; जगबुडी, वाशिष्ठीसह नद्यांचे पाणी वाढल्याने पुर परिस्थिती 

By शोभना कांबळे | Updated: July 19, 2023 18:07 IST

काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर, चिपळूण व खेड तालुक्यांतील शाळांना सुट्टी 

रत्नागिरी : वादळी पावसाने बुधवार सकाळपासून जिल्ह्याला झोडपण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील जगबुडी, गडनदी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून वाशिष्ठी, अर्जुना, नारिंगी नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. त्यामुळे खेड, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर या शहरांमध्ये पुराचे पाणी भरले. त्यामुळे काही लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. परशुराम घाटातील रस्ता दरड कोसळल्याने वाहतुकीकरीता बंद ठेवण्यात आला असून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.रत्नागिरी जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. खेडमधील जगबुडी नदीने बुधवारी धोका पातळी ओलांडून १०.८० मीटरची पातळी गाठली. खेड शहरात अनेक भागात दुपारपर्यंत सुमारे ३ फूट इतके पुराचे पाणी भरले. तेथील दुकानदार यांनी दुकाने बंद करून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत.शहरातील काही भागातील तसेच बोरघर, खारी, खांबतळे येथील काही नागरिकांचे स्थलांतर केले आहे. भोस्तेत जगबुडी नदीचे पाणी आल्याने भोस्ते-अलसुरे वाहतूक बंद आहे. नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे चालू आहे. नारिंगी नदीच्या पुरामुळे दापोली खेड रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. काही ठिकाणी झाडे कोसळणे, रस्त्याला भेगा पडण्याच्या घटना घडल्या आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे. खेड शहरात ५ बोटी तैनात करण्यात आल्या असून अलसुरे येथे 1 बोट तैनात करण्यात आली आहे.चिपळूण तालुक्यातही वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. शहरातील काही ठिकाणी १ फूटापर्यंत पाणी भरलेले आहे. नगरपालिकेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, एस. टी. स्टॅंढ, नगरपालिका कार्यालय अशा ५ ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ, नगरपालिका, पोलिस, तलाठी यांची पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे

  • कुंभार्ली घाटात दरड कोसळली होती. मात्र, दरड बाजूला करण्यात आली आहे.
  • कोकण रेल्वे मार्गावर कोणतीही समस्या नाही. वाहतूक सुरळीत सुरू आहे.
  • जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पूरस्थिती लक्षात घेऊन चिपळूण व खेड या दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी दिली आहे.
  • मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादुरशेख पुलाजवळून एक गाई व एक म्हैस वशिष्ठी नदीत वाहून गेल्या आहेत.
  • जुना कॉटेज, भेंडी नाका येथिल ट्रान्सफॉर्मर पुरामुळे बंद करून ठेवल्याने विद्युत पुरवठा बंद आहे.
  • संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील मुंबई -गोवा महामार्गावर गडनदीचे पाणी आता धोका पातळीवर आहे. दक्षता म्हणून एक मार्गी वाहतूक सुरू आहे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfloodपूर