चिपळुणात हातभट्टीवर धाड, साडेतीन लाखांचा मुद्देमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST2021-06-18T04:22:59+5:302021-06-18T04:22:59+5:30
चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाने तळ येथे सुरू असणाऱ्या गावठी हातभट्टीवर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ...

चिपळुणात हातभट्टीवर धाड, साडेतीन लाखांचा मुद्देमाल
चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाने तळ येथे सुरू असणाऱ्या गावठी हातभट्टीवर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बुधवारी धाड टाकली. या कारवाईत इर्टीगा कारसह ३ लाख ५० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुध्द पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
सचिन चव्हाण (४२, रा़ मार्गताम्हाने, चव्हाणवाडी) व मनोज तुकाराम भडवळकर (३५, रा़ मिरवणे, अंगणवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबतची पोलीस नाईक फिर्याद महेश जाधव यांनी दिली. मार्गताम्हाने येथे गावठी हातभट्टीची दारू गाळली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी धाड टाकून कारवाई केली. यावेळी तिथे सचिन चव्हाण व मनोज भडवळकर हे दारू गाळीत असताना रंगेहाथ सापडले.