लांजात जुगार अड्ड्यावर धाड, सहाजणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:10+5:302021-07-02T04:22:10+5:30

लांजा : शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात राजरोसपणे अवैधरित्या अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर लांजा पोलिसांनी धाड टाकून जुगार ...

Raid on gambling den in Lanjat, crime registered against six persons | लांजात जुगार अड्ड्यावर धाड, सहाजणांवर गुन्हा दाखल

लांजात जुगार अड्ड्यावर धाड, सहाजणांवर गुन्हा दाखल

लांजा : शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात राजरोसपणे अवैधरित्या अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर लांजा पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या सहाजणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी फिर्याद पोलीस हवालदार अरविंद कांबळे यांनी दिली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा शासकीय विश्रामगृह परिसरातील जस्मिन अपार्टमेंटमध्ये सदानंद म्हेत्रे हे अवैधरित्या जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लांजा पोलिसांनी सापळा रचून बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी धाड टाकली. या धाडीत एका बंद खोलीत सहाजण पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. या धाडीमध्ये जुगार चालक सदानंद म्हेत्रे याच्यासह सुरेश क्षीरसागर, सुभाष बापर्डेकर, संदीप चव्हाण, संतोष पाटोळे, लियाकत मालदार अशा सहाजणांना जुगार खेळताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील रोख रकमेसह जुगार खेळण्याचे साहित्य असा ८,७५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश कानडे, प्रभारी पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, भालचंद्र रेवणे, अरविंद कांबळे, राजेंद्र कांबळे, राजेश वळवी, चालक चेतन घडशी यांचा समावेश हाेता.

Web Title: Raid on gambling den in Lanjat, crime registered against six persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.