मिरवणे येथे हातभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST2021-09-13T04:30:40+5:302021-09-13T04:30:40+5:30
चिपळूण : तालुक्यातील मिरवणे येथील बागेशरी या जंगलमय भागात गावठी हातभट्टीवर येथील पोलिसांनी छापा टाकून ८ हजार २१० ...

मिरवणे येथे हातभट्टीवर धाड
चिपळूण : तालुक्यातील मिरवणे येथील बागेशरी या जंगलमय भागात गावठी हातभट्टीवर येथील पोलिसांनी छापा टाकून ८ हजार २१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शिवराम धोंडू भडवळकर (६०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी आपल्या पथकासमवेत गस्त घालत असताना मिरवणे येथे हातभट्टी गाळली जात असल्याची माहिती मिळाली. यानुसार बागेशरी या जंगलमय परिसरात आले असता एक जण गावठी हातभट्टी गाळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्यासह पोलिसांनी केली. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक महेश महेंद्र जाधव यांनी येथील पोलीस स्थानकात दिली आहे.