पोलीस स्थानकात राडा करणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST2021-07-30T04:33:35+5:302021-07-30T04:33:35+5:30
लांजा : पोलिसांच्या रेकॉर्डवरील असलेल्या गुन्हेगाराने पोलीस स्थानकात येऊन पोलिसांनीच शिवीगाळ करून राडा केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्याने ...

पोलीस स्थानकात राडा करणाऱ्याला अटक
लांजा : पोलिसांच्या रेकॉर्डवरील असलेल्या गुन्हेगाराने पोलीस स्थानकात येऊन पोलिसांनीच शिवीगाळ करून राडा केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्याने पोलिसांना धक्काबुक्कीही केली असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर मुजफ्फर हुसेन नेवरेकर (वय ३८, रा. लांजा बाजारपेठ) बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्यादरम्यान काहीही काम नसताना पोलीसस्थानकात येऊन ओरडाओरडा करत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांना उद्देशून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पोलीस स्थानकात ओरडाओरडा करू नकोस, असे सांगणाऱ्या पोलिसांना त्याने शिवीगाळ केली आणि हेडकाॅन्टेबल भालचंद्र रेवणे यांची काॅलर पकडून धक्काबुक्की केली.
या प्रकारामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीसाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात नेले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही त्याने शिवीगाळ केली. या प्रकाराची फिर्याद पोलीस हेडकाॅन्टेबल भालचंद्र रेवणे यांनी दिली असून, मुजफ्फरला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील करीत आहेत.