उत्खनन, अवैध वाहतूक; ५१ लाख दंड

By Admin | Updated: August 22, 2014 23:18 IST2014-08-22T23:03:51+5:302014-08-22T23:18:51+5:30

तहसील कार्यालयात सर्वाधिक वसुली चिपळूणने केली आहे.

Quarrying, illegal transportation; 51 lakh penalty | उत्खनन, अवैध वाहतूक; ५१ लाख दंड

उत्खनन, अवैध वाहतूक; ५१ लाख दंड

रत्नागिरी : जिल्ह्यातील गौणखनिजांचे उत्खनन आणि अवैध वाहतुकीपोटी गेल्या चार महिन्यात उपविभागीय अधिकारी कार्यालये आणि तहसील कार्यालयांनी एकूण ५१ लाख, ११ हजार ८०६ रूपये इतका दंड वसूल केला आहे. यात खेड उपविभागीय प्रांत कार्यालय आघाडीवर आहे, तर चिपळूण प्रांत कार्यालयाची केवळ ४,७०० इतकीच वसुली झाली आहे. मात्र, तहसील कार्यालयात सर्वाधिक वसुली चिपळूणने केली आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून वाळू, चिरा उत्खनन यावर पर्यावरण मंत्रालयाने बंदी आणली आहे. त्यामुळे काही ठिकाणी छुप्या पद्धतीने अजूनही वाळू उत्खनन सुरू आहे. त्याची अवैध वाहतूक केली जात आहे. याला आळा बसण्यासाठी प्रांत कार्यालये तसेच तहसील कार्यालयांच्या भरारी पथकाने छापा टाकून कारवाईपोटी हा दंड वसूल केला आहे.
सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसील कायालये यांनी एप्रिल ते जुलै २०१४ या चार महिन्यात आपापल्या क्षेत्रात गौण खनिजांचे उत्खनन आणि त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर हा कारवाईचा बडगा उगारला होता. गेल्या चार महिन्यात झालेल्या कारवाईपोटी खेड प्रांत कार्यालयाने इतर प्रांत कार्यालयांपेक्षा जास्त दंड वसूल केला असून, ही रक्कम १० लाख २ हजार ३३० इतकी आहे, तर तहसील कार्यालयांमध्ये चिपळूण अव्वल आहे.
सर्व तालुक्यांमध्ये वाळू उत्खनन तसेच तिची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर हा कारवाईचा बडगा उगारला असला तरी काही ठिकाणी वाळूचे उत्खनन (प्रतिनिधी)

प्रांत कार्यालयरक्कम
खेड१००२३३०
रत्नागिरी९६८००
चिपळूण४७००
दापोली००
राजापूर००

तहसील कार्यालयरक्कम
चिपळूण१२३७७२५
खेड३५९५०५
दापोली३५८०९१
मंडणगड३३२०७५
संगमेश्वर२१५९५०
गुहागर१६७१५०
रत्नागिरी१५७८५०
राजापूर५२३००
लांजा२३५००
एकूण४००७९७६

Web Title: Quarrying, illegal transportation; 51 lakh penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.