शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील कुवारबावला अग्नितांडव; बाजारपेठ बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 15:24 IST

महावितरणच्या कुवारबाव येथील पॉवर हाऊसच्या कुंपणातील गवताने बुधवारी दुपारी ३.३० वाजता पेट घेतला. ही आग वाऱ्यामुळे कुवारबाव बाजारपेठेपर्यंत पोहोचली.

ठळक मुद्देआग भडकण्याच्या भीतीने तणाववीज उपकेंद्राच्या आवारातील गवत पेटल्याने आगडोंबसुदैवाने उपकेंद्र वाचले

रत्नागिरी : महावितरणच्या कुवारबाव येथील पॉवर हाऊसच्या कुंपणातील गवताने बुधवारी दुपारी ३.३० वाजता पेट घेतला. ही आग वाऱ्यामुळे कुवारबाव बाजारपेठेपर्यंत पोहोचली.

आगीचे हे तांडव महावितरणाच्या वीज जनित्रांसह कुवारबाव बाजारपेठ विळख्यात घेणार अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, रत्नागिरी नगर परिषदेचा अग्निशामक बंब वेळेत घटनास्थळी पोहोचला. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशामकाला ही आग विझविण्यात यश आले. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे समजू शकलेले नाही.कुवारबाव - मिरजोळे येथे रत्नागिरी - हातखंबा मुख्य मार्गाला लागूनच महावितरणचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. हे गवत पेटल्यानंतर आगडोंब उसळला. कुवारबाव व्यापारी पेठेतील व्यापारी गाळ्यांपर्यंत ही आग पोहोचली. काही प्रमाणात व्यापारी गाळ्यांनाही आगीची झळ बसली. व्यापारी गाळे तसेच महावितरणच्या लोखंडी कुंपणाच्या बाहेर जवळच असलेल्या इमारती, बंगले यांच्यापर्यंत आगीचे तांडव पोहोचले.या प्रकाराने भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी मिळेल त्या भांड्यातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. जवळच्या एका बंगल्याजवळ आग पोहोचताच त्या कुटुंबियांनी धाव घेत पंपाद्वारे विहिरीचे पाणी फवारत आगीचे संकट थोपविण्याचा प्रयत्न केला.

उपकेंद्राच्या आवारातील आतील भागात वाऱ्यामुळे वेगात पसरत गेल्याने आतील विद्युत जनित्रे आगीच्या टप्प्यात आली होती. मात्र, अग्निशामक बंब आतील भागात नेवून ही आग विझविण्यात आली.जोराचा वारा असल्याने आग विझविल्यानंतर काहीवेळात पुन्हा भडकत होती. घरांप्रमाणेच उपकेंद्राशेजारी काही अपार्टमेंट्सही आहेत. वाऱ्यामुळे तेथपर्यंत आग पसरण्याची भीती होती. मात्र, अग्निशामक दल व ग्रामस्थांनी शर्थ केल्याने ही आग आटोक्यात आणणे शक्य झाले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआगmahavitaranमहावितरण