काका-काकूवर सुरीने वार करणारा पुतण्या अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:29 IST2021-04-12T04:29:04+5:302021-04-12T04:29:04+5:30

रत्नागिरी : पाेलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून पुतण्याने काका-काकूवर सुरीने वार केल्याची घटना रविवारी पहाटे रत्नागिरी शहरातील मुरूगवाडा येथे घडली. ...

Putanya arrested for stabbing uncle and aunt | काका-काकूवर सुरीने वार करणारा पुतण्या अटकेत

काका-काकूवर सुरीने वार करणारा पुतण्या अटकेत

रत्नागिरी : पाेलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून पुतण्याने काका-काकूवर सुरीने वार केल्याची घटना रविवारी पहाटे रत्नागिरी शहरातील मुरूगवाडा येथे घडली. याप्रकरणी शहर पाेलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत शिवराम नागवेकर (वय ४०, रा. मुरुगवाडा) यांनी त्यांचा पुतण्या ईशान दीपक नागवेकर (रा. मुरुगवाडा) हा दारू पितो म्हणून पोलिसांकडे तक्रार दिली होती. याचा राग येऊन ईशानने रविवारी पहाटे ५ वाजता काकांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्याने प्रशांत आणि त्यांची पत्नी यांच्यावर सुरीने वार करत हल्ला केला आणि शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच काकूच्या गळ्यातले मंगळसूत्र आणि कानातली कुडी ताेडून नुकसान केले.

याप्रकरणी प्रशांत नागवेकर यांच्या तक्रारीवरून ईशान नागवेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार अशोक राठोड अधिक तपास करत आहेत.

Web Title: Putanya arrested for stabbing uncle and aunt