शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात येथील राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीच्या योगकन्या किनरे भगिनींचा सहभाग

By शोभना कांबळे | Updated: October 8, 2022 17:17 IST

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच योगाचा समावेश

रत्नागिरी : अहमदाबाद (गुजरात) येथे सुरू असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धोसाठी येथील पूर्वा किनरे आणि प्राप्ती किनरे यांचा सहभाग आहे. शासनाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच योगाचा समावेश झाला असून किनरे भगिनी या स्पर्धत सहभागी होणाऱ्या जिल्हयातील पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत.      ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरातमधील अहमदाबाद येथे ७ ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. १२ ऑक्टोबरपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार आहेत. या स्पर्धत यंदा प्रथमच योगासन या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धसाठी रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयातील योग प्रशिक्षण केंद्राच्या योगपटू पूर्वा किनरे आणि प्राप्ती किनरे यांची निवड झाली आहे. जिल्हयातून निवड झालेल्या त्या एकमेव खेळाडू आहेत. गेली दहा वर्षे त्या जिल्हा क्रीडा कार्यालयाचे योग प्रशिक्षक रवि भूषण कुमठेकर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत.तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी मिलींद दीक्षित, नितीन तारळकर, चंद्रदीप शिंदे, क्रीडाशिक्षक विनोद मयेकर, राजेश आयरे, किरण जोशी, श्रध्दा जोशी यांनी या दोघींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.पूर्वा आणि प्राप्ती किनरे या भगिनी योगाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी आजवर विविध राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील स्पर्धमध्ये सुवर्णपदके पटकावली आहेत. राष्ट्रीय शालेय स्पर्धत पूर्वाने ६ वेळा तर प्राप्तीने ५ वेळा सुवर्ण आणि रौप्यपदके पटकावली आहेत. पूर्वा हिने फ्रान्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धात तीन रौप्यपदके मिळवली आहेत. भारत योगसम्राज्ञी, मिस योगिनी हे पुरस्कारही तिने मिळविले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGujaratगुजरातYogaयोगासने प्रकार व फायदे