मराठे महाविद्यालयाची पूर्वा बाकाळकर झळकली टेनिस क्रिकेट संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST2021-03-26T04:30:49+5:302021-03-26T04:30:49+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : येथील आबासाहेब मराठे आर्ट्स ॲण्ड न्यू कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय राजापूरची विद्यार्थिनी पूर्वा दीपक ...

Purva Bakalkar of Maratha College shines in the tennis cricket team | मराठे महाविद्यालयाची पूर्वा बाकाळकर झळकली टेनिस क्रिकेट संघात

मराठे महाविद्यालयाची पूर्वा बाकाळकर झळकली टेनिस क्रिकेट संघात

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : येथील आबासाहेब मराठे आर्ट्स ॲण्ड न्यू कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय राजापूरची विद्यार्थिनी पूर्वा दीपक बाकाळकर हिची टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियामार्फत आयोजित पाचव्या सिनिअर (वुमन) नॅशनल टेनिस क्रिकेट संघात निवड झाली होती. ही स्पर्धा भुवनेश्वर (ओडिशा) येथील सेंच्युरिअन विद्यापीठ येथे पार पडली.

या स्पर्धेत मुंबई संघातर्फे पूर्वा हिने सहभाग घेऊन नेत्रदीपक कामगिरी केली. मुंबई संघातर्फे खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत तिने तृतीय क्रमांक मिळवून दिला. पूर्वा हिची मुंबई संघात निवड झाली होती. त्यांच्या या यशाबद्दल संघाला कास्यपदक देऊन गौरविण्यात आले.

या यशात पूर्वा हिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार व जिमखाना प्रमुख प्रा. जी. डी. हराळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Purva Bakalkar of Maratha College shines in the tennis cricket team