CoronaVirus Lockdown : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंबा खरेदी, विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:55 AM2020-04-21T10:55:56+5:302020-04-21T10:59:15+5:30

खुल्या बाजारातील आंबा विक्रीला मर्यादा आल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २३ एप्रिलपासून दुपारी ३ वाजल्यापासून आंब्याची खरेदी विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त सभेत हा निर्णय घेतला.

Purchase, sale of mangoes in the premises of the Agricultural Income Market Committee | CoronaVirus Lockdown : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंबा खरेदी, विक्री

CoronaVirus Lockdown : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंबा खरेदी, विक्री

Next
ठळक मुद्दे२३ एप्रिलपासून आंब्याची खरेदी विक्री सुरूलॉकडाऊनमुळे खुल्या बाजारात आंबा विक्रीला मर्यादा

रत्नागिरी : खुल्या बाजारातील आंबा विक्रीला मर्यादा आल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २३ एप्रिलपासून दुपारी ३ वाजल्यापासून आंब्याची खरेदी विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त सभेत हा निर्णय घेतला.

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमन कायद्यान्वये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा आंबा खरेदी- विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात तरतूद आहे.

या बाबीचा विचार करून ही बैठक घेण्यात आली. या सभेमध्ये जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित आंबा रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेऊन येण्याबाबत आवाहन केले.

बाजार समितीने आंबा घेऊन येताना त्याची प्रत गुणवत्ता चांगली असावी फळाचे वजन १८० ग्रॅम पेक्षा जास्त असावे व डाग विरहित असावा. अधिक माहितीसाठी    am_ratnagiri@msamb.com  या ई-मेल वर अथवा किरण महाजन, संजय आयरे यांच्याशी संपर्क साधावा.
 

Web Title: Purchase, sale of mangoes in the premises of the Agricultural Income Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.