शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 11:52 IST

TraficPolice Bike Ratnagiri- सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण स्वारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत असे आरसे न लावणाऱ्या तब्बल ३,६१९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

ठळक मुद्देदुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाईदुचाकीला आरसा बंधनकारक, दुचाकीस्वारांना नियमांचा विसर

रत्नागिरी : सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण स्वारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत असे आरसे न लावणाऱ्या तब्बल ३,६१९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.बाजू काढून पुढे जाताना किंवा वळताना सुरक्षिततेसाठी दुचाकींना दोन्ही बाजुला आरसा लावणे परिवहन विभागाकडून सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, त्याकडे बरेच दुचाकीस्वारांचे दुर्लक्ष होत असते. आरसा लावलेला नसल्याने बाजू काढून जाताना किंवा वळताना मागून आलेले वाहन न दिसल्याने दुचाकीवर मागून आलेले वाहन आपटल्याने अनेक गंभीर आजार झाले आहेत. त्यामुळे दुचाकींवर सक्तीने आरसे बसविण्याचा नियम करण्यात आला आहे. परंतु दुचाकीस्वारांना या नियमांचाच विसर पडला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेने धडक कारवाइई राबविली. जानेवारी ते २५ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेत तब्बल ३९१९ स्वारांच्या दुचाकीला आरसेच नसल्याचे दिसून आल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालविताना वाहनचालक आणि इतर जनता यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम करण्यात आले आहेत. मात्र, वाहनचालकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात आहे. वाहनचालकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.आरसा नाही म्हणून २०० रुपये दंडवाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे, म्हणून वाहतूक शाखेकडून मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत दुचाकींना आरसे नसलेल्या ३,६१९ स्वारांकडून २०० रूपयांप्रमाणे ७,२३,८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.दुचाकीचालकांना हे बंधनकारकदुचाकी स्वारांसाठी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान हेल्मेट सक्तीचे आहे. याचबरोबर प्रदुषणमुक्त प्रमाणपत्र, गाडीचा विमा, आर. सी. बुक तसेच अन्य गाडीची कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.

वाहतुकीचे नियम हे वाहन चालक आणि नागरिकांंच्या सुरक्षिततेसाठी आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे मार्गांवर अपघात होताना दिसतात. दुचाकीस्वार हेल्मेट, आरसा याचा वापर करीत नसल्यानेही अनेक गंभीर अपघात झाले असून त्यात प्रसंगी दुचाकीस्वारांना प्राण गमवावा लागला आहे. आपल्याच सुरक्षिततेची काळजी या स्वारांनी घेतली तर पोलीसांना कायद्याचा बडगा उगारावा लागणार नाही. त्यामुळे अपघातही कमी होतील.- शिरीष सासने, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसbikeबाईकRatnagiriरत्नागिरी