शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पुंडलिकाचे मंदिर पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 18:33 IST

अडीच फुट रुंदीच्या भिंती व त्याला घुमट सदृश्य कळस व पाण्याच्या प्रवाहाचा मारा चुकविण्यासाठी होडीच्या आकाराचा चौथरा व चारही बाजूला पाणी हे दृश्य विहंगम असते.

ठळक मुद्देया मंदिराच्या त्रिकोणी चौथºयावर बसून भक्तांना दर्शन देत असत

अरुण आडिवरेकर ।रत्नागिरी : भक्त पुंडलिकाचे मंदिर चक्क दोन दिवस पाण्यात राहिल्याची घटना राजापूर येथे घडली. अर्जुना नदीच्या पात्रात असणारे पुंडलिकाचे मंदिर दोन दिवस पुराच्या पाण्याने वेढलेले होते.पंढपुरातील विठ्ठलाच्या मंदिरासमोर जसे पुंडलिकाचे मंदिर उभारण्यात आले आहे. तसेच राजापूर येथील विठ्ठल मंदिरासमोर अर्जुना नदीच्या पाण्यात मध्यभागी फार पुरातन पुंडलिकाचे मंदिर आहे. पावसाळ्यात येणाऱ्या पुरामध्येही हे मंदिर आपले अस्तित्व टीकवून आहे. अडीच फुट रुंदीच्या भिंती व त्याला घुमट सदृश्य कळस व पाण्याच्या प्रवाहाचा मारा चुकविण्यासाठी होडीच्या आकाराचा चौथरा व चारही बाजूला पाणी हे दृश्य विहंगम असते.राजापुरात ज्या वेळेला गंगा येते त्यावेळी प्रथम उन्हाळेवर गरम पाण्याची आंघोळ करणे, त्यानंतर गंगेवर स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेऊन धूतपापेश्वरावर अभिषेक केल्यास काशी यात्रेची पूर्तता होते अशी राजापूरकरांची श्रद्धा आहे. पावसाळ्यात मोठ्या पुराच्या वेळी येथील दृश्य भीतीदायक असते पण कमी पाणी असताना हा परिसर म्हणजे नैसर्गिक सौंदर्याने भरून गेलेला असतो. गगनगिरी महाराज गंगा भेटीला येत त्यावेळी या मंदिराच्या त्रिकोणी चौथºयावर बसून भक्तांना दर्शन देत असत, असेही सांगण्यात येते.राजापुरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अर्जुना नदीसह कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अर्जुना नदीला पूर येऊन त्याचे पाणी जवाहर चौकात शिरले. पुराच्या पाण्यामुळे अर्जुना नदी पात्रात असणाºया पुंडलिकाच्या मंदिरालाही पाण्याने वेढा घातला. पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर मंदिराभोवतालचे पाणीदेखील ओसरू लागले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस