पंचनदी धरण भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 18:02 IST2017-08-14T18:02:46+5:302017-08-14T18:02:50+5:30

पंचनदी धरण भरले
दाभोळ : दापोली तालुक्यातील दाभोळ गावाला पाणी पुरवठा करणाºया दाभोळजवळील पंचनदी धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे हे धरण सध्या तुडुंब भरले असून यामुळे दाभोळ गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या बºयाच अंशी दूर होण्यास मदत होणार असल्यामुळे दाभोळवासीयांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.
गेल्या महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीचा फायदा पंचनदी धरणाला झाला. नदी, नाले, ओढ्यांमुळे हे धरण पूर्णत: भरले गेले आहे. दाभोळ ग्रामपंचायतीच्यावतीने पंचनदी धरणातून गेली अनेक वर्षे दाभोळवासीयांची तहान भागवली जात आहे.