सरकारी वकील विनय गांधी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST2021-03-30T04:18:46+5:302021-03-30T04:18:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : येथील प्रसिद्ध सरकारी वकील विनय ऊर्फ बाबा गांधी (५४) यांचे हृदयविकाराने कोल्हापूर येथे रविवारी ...

सरकारी वकील विनय गांधी यांचे निधन
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : येथील प्रसिद्ध सरकारी वकील विनय ऊर्फ बाबा गांधी (५४)
यांचे हृदयविकाराने कोल्हापूर येथे रविवारी पहाटे निधन झाले. विनय गांधी हे मूळचे महाड तालुक्यातील पोलादपूर जवळेचे रहिवासी हाेते. व्यवसायानिमित्ताने ते रत्नागिरीत आले.
त्यांनी
सरकारी वकील म्हणून कार्यभार घेतल्यानंतर प्रकरण तडीस नेण्याचे प्रमाण
वाढले होते. कमी कालावधीत त्यांनी अनेकांना योग्य तो न्याय मिळवून दिला
होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिवंगत ॲड. केतन घाग यांच्या कार्यालयात ज्युनिअर म्हणून काम केले. जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करीत असताना मेहनत, चांगली तयारी, योग्य
संदर्भ, प्रामाणिक प्रयत्न व मांडणी याद्वारे त्यांनी फौजदारी कामातील
शिक्षेचे प्रमाण दखल घेण्याइतपत वाढविले. ते उत्तम बुद्धिबळपटू होते.
कार्यतत्पर
स्वभाव, मिश्कील वृत्ती, सकारात्मक दृष्टिकोन, हसरा व आनंदी अशी कोर्ट
रूमच्या रुक्ष वातावरणात त्यांची ओळख होती.