राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लांजात महागाईच्या विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST2021-07-07T04:38:18+5:302021-07-07T04:38:18+5:30

लांजा : पेट्रोल, डिझेल तसेच वाढत्या महागाई विराेधात लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर ...

Protests by NCP against inflation in Lanjat | राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लांजात महागाईच्या विरोधात निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लांजात महागाईच्या विरोधात निदर्शने

लांजा : पेट्रोल, डिझेल तसेच वाढत्या महागाई विराेधात लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार समाधान गायकवाड यांना निवेदन सादर करण्यात आले.

लांजा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध केला. घरगुती गॅसच्या वाढत्या किमती, पेट्रोल, डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत्या दराच्या विराेधात घाेषणाबाजी करण्यात आली. या आंदाेलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनंत आयरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा क्षेत्राध्यक्षा क्षमा थोडगे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे, तालुका कार्यकारिणी सदस्य विकास चव्हाण, तालुका संघटक अमोल चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस साटवली विभाग अध्यक्ष शशिकांत बापर्डेकर, राजेश माईल, कृष्णा माईल, किशोर सावंत, युवती तालुका संघटक कोमल पाटील, मुस्कान पाठणकर, जुबेदा नाईक, कुलसुंबी प्रभूलकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

-----------------------------

दरवाढी विराेधात लांजा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदाेलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

Web Title: Protests by NCP against inflation in Lanjat