शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदलीविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 11:14 IST

Ramdas Kadam KhedPolice Ratnagiri- खेड येथील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदलीच्या कारवाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीतर्फे गुरूवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी रामदासभाई कदम माफी मागा अशी जोरदार मागणी करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. शिवसेना नेते, आमदार रामदास कदम यांनी सुवर्णा पत्की यांच्याविषयी विधानपरिषद सभागृहात केलेली शेरेबाजी ही समस्त स्त्रीवर्गाचा अपमान करणारे असल्याचे मनसेच्या तालुकाध्यक्ष उर्मिला शेटे-पाटणे यांनी सांगितले.

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदलीविरोधात निदर्शनेरामदासभाई माफी मागा, मनसेच्या महिलांनी केली घोषणाबाजी

खेड : येथील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदलीच्या कारवाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीतर्फे गुरूवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी रामदासभाई कदम माफी मागा अशी जोरदार मागणी करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. शिवसेना नेते, आमदार रामदास कदम यांनी सुवर्णा पत्की यांच्याविषयी विधानपरिषद सभागृहात केलेली शेरेबाजी ही समस्त स्त्रीवर्गाचा अपमान करणारे असल्याचे मनसेच्या तालुकाध्यक्ष उर्मिला शेटे-पाटणे यांनी सांगितले.दोन वर्षांच्या काळात अनेक गुन्ह्यांची उकल पत्की यांनी यशस्वीपणे केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण कमी झाले आहे. या दोन वर्षात कोणत्याही जातीय किंवा धार्मिक दंगलीची घटना घडली नाही. दोन्ही समाजांमध्ये अत्यंत चांगले संबंध निर्माण केले. तसेच कोविड कालावधीत उत्तम प्रकारे समाजकार्य करत लॉकडाऊन यशस्वी केला आहे. गरजवंताना जिन्नस वाटप केले. गेले १० महिने स्वतः एक महिला असताना स्वतःची काळजी न घेता जनतेची काळजी घेतली. अशा व्यक्तीचा खरे तर सन्मान व्हायला पाहिजे होता. परंतु, त्यांच्यावर शेरेबाजी केली गेली, हे दुर्दैवी असल्याचे मत या महिलांनी मांडले आहे.आमची सरकारला विनंती आहे. त्यांची अन्यायकारक बदली त्वरीत रद्द करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करू, असा इशारा या निवेदनात दिला आहे. शिवसेनेने केलेला विरोध आणि मनसेकडून पाठराखण यामुळे आता या विषयाला पक्षीय स्वरूप आले आहे.अश्लिल शेरेबाजीमाजी मंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत महिला पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना अश्लिल भाषेत दुपारी आणि रात्री त्यांची अवस्था काय असते, अशी शेरेबाजी केली आहे. एक महिला म्हणून आम्ही अशा शेरेबाजीचा निषेध करतो, असे निदर्शन करणाऱ्या महिलांनी म्हटले आहे. सुवर्णा पत्की यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचे विशेष कौतुकही या महिलांनी केले आहे.माफी मागायला हवीया शेरेबाजीतून केलेले विधान रामदास कदम यांनी त्वरित मागे घेऊन महिला वर्गाची माफी मागावी, अशी मागणी मनसे महिला आघाडीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे. खेडवासीय सर्व महिला उत्तम काम करणाऱ्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या पाठीमागे ठामपणे उभ्या आहोत, असेही या महिलांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे.

टॅग्स :khed policeखेड पोलीसRamdas Kadamरामदास कदमMNSमनसेRatnagiriरत्नागिरी