शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळवाडी धरणाच्या सांडव्याची संरक्षण भिंत ढासळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 17:27 IST

खेड : तालुक्यातील पिंपळवाडी (डुबी) धरणाच्या सांडव्याच्या संरक्षण भिंतीचा भाग कोसळला आहे. या धरणाच्या सांडव्याच्या तळातून मोठ्याप्रमाणावर गळती लागल्याने ...

ठळक मुद्देपिंपळवाडी धरणाच्या सांडव्याची संरक्षण भिंत ढासळलीसात गावांना धोका, गळतीचे पाणी खोपी गावातील शेतात

खेड : तालुक्यातील पिंपळवाडी (डुबी) धरणाच्या सांडव्याच्या संरक्षण भिंतीचा भाग कोसळला आहे. या धरणाच्या सांडव्याच्या तळातून मोठ्याप्रमाणावर गळती लागल्याने धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या सात गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धरणाच्या सांडव्याला मोठ्याप्रमाणावर गळती लागलेले पाणी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या खोपी गावातील शेतीमध्ये गेल्याने भातशेती देखील पाण्याखाली गेली आहे. धरणाच्या सांडव्याचा भाग कोसळला तर सात गावांना धोका निर्माण होण्याची भीती आहे.जलसंपदा विभाग रत्नागिरी अंतर्गत असणारे पिंपळवाडी (डुबी) धरणाच्या सांडव्याची भिंत तीन वर्षांपूर्वी नादुरुस्त झाली आहे. तेव्हापासून ग्रामस्थांनी या सांडव्याच्या भिंतीच्या दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नादुरुस्त असलेली सांडव्याची संरक्षण भिंत अर्धी कोसळली असून, या सांडव्याच्या तळातून मोठी गळती लागली आहे. गळती लागलेले पाणी शेतात शिरले असून, अनेकांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. या धरणाच्या पायथ्याशीच खोपी, शिरगाव, कुळवंडी, बिजघर, कुंभाड, एनवरे, अशी सात गावे असून या सांडव्याची भिंत वाहून गेल्यास या गावांना धोका असल्याने लोक भयभीत झाले आहेत.पिंपळवाडी (डुबी) धरणाची क्षमता २७ दशलक्ष घनमीटर एवढी असून आता हे धरण ६७ टक्के भरले आहे. आता या धरणात १८.८९५ दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साथ झाला असून, १६०.१० क्युसेक्स आणि ५ हजार ६५२.४५ क्युसेक्स घनमीटर सेकंद एवढ्या पाण्याचा विसर्ग सध्या सुरु आहे. या धरण क्षेत्रात आतापर्यंत या वर्षी २७५९ मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. धरणाच्या सांडव्याची भिंत अर्धी कोसळल्याने आणि सांडव्याच्या तळाला मोठी गळती लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी