रस्ते दुरुस्तीचा सव्वाचार कोटींचा प्रस्ताव खड्ड्यात
By Admin | Updated: September 20, 2015 00:09 IST2015-09-20T00:09:39+5:302015-09-20T00:09:59+5:30
सरकारकडून दुर्लक्ष : ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण

रस्ते दुरुस्तीचा सव्वाचार कोटींचा प्रस्ताव खड्ड्यात
रत्नागिरी : ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले असून गणरायाचे आगमन झाले तरी अद्यापही खड्डे भरण्यात आलेले नाहीत. जिल्हा परिषदेचा रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी सव्वाचार कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे धूळ खात पडून आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. खेड्यापाड्यांतील रस्त्यांवर पावलोपावली खड्डे पडल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गतवर्षी आघाडी शासनाच्या कालावधीत जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांनी रस्ते दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेला साडेसतरा कोटी रुपये निधी मिळाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा निधीचा ओघ थांबला आहे. पावसाचे प्रमाण बरेच असल्यामुळे रस्ते खराब होतात आणि योग्य वेळेत डागडुजी न झाल्यामुळे अंदाजपत्रक वाढतच जाते.
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. मात्र, पावसाळा संपत आला तरी शासनाकडून दमडीही आलेली नाही. आता गणरायांचे आगमनही झाले आहे. खड्डेमय रस्त्यांवरूनच (पान ५ वर)