शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By शोभना कांबळे | Updated: March 1, 2023 15:23 IST

गेल्या ५३ वर्षात ॲल्युमिनियम प्रकल्प उभारण्यात आला नाही

रत्नागिरी : ॲल्युमिनियम (BALCO) कारखान्यांसाठी नजीकच्या शिरगाव येथील सुमारे ८३० शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमीन संपादित  करण्यात आल्या. मात्र, १९७० सालापासून त्यावर प्रकल्प न करता या जागा खासगी कंपन्यांना देण्यात आल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून या शेतकऱ्यांना त्यांच्या जागा परत द्याव्यात अथवा त्यांना नवीन दरानुसार त्याचा मोबदला मिळावा, यासाठी आक्रमक झालेल्या नजिकच्या शिरगाव आणि परिसरातील अल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन केले. यात सुमारे १५० शेतकरी सहभागी झाले होते.झाडगाव म्युनिसिपल हद्दीच्या आतील आणिबाहेरील तसेच शिरगाव ग्रामपंचायतीतील काही शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी घेण्यात आल्या. १९७० सालापासून आत्तापर्यंत या जमिनीत कोणताही कारखाना कुठल्याच सरकारने आणला नाही. ही जमीन पडीक अवस्थेत आहे. गेल्या ५३ वर्षात ॲल्युमिनियम प्रकल्प उभारण्यात आला नाही. त्यामुळे  हे शेतकरी ५३ वर्षे उत्पन्नापासून वंचित राहिले आहेत. तसेच शेतकऱ्यांना सरकारने आश्वासन दिल्या प्रमाणे नोकऱ्या उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात.

संपादित केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना काही कारणास्तव परत करता येत नसतील तर या जागेचा चालू बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, अशी मागणी ॲल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी संघाच्या माध्यमातून केली जात आहे. मात्र, या मागणीची दखल आतापर्यंत सरकारने न घेतल्याने या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा दिवस धरणे आंदोलन केले.यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांंचीही शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना या मागणीचे निवेदनही दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपण हे निवेदन एमआयडीसीकडे वर्ग करू तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही दिली.जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देताना ॲल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी संघाचे राजन आयरे, प्रसन्न दामले, चंद्रशेखर नातोंडकर, उमेश खंडकर, सलील डाफळे यादी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरीagitationआंदोलन