कारागृह अधिकाऱ्याला शिपायाची मारहाण

By Admin | Updated: July 18, 2016 00:03 IST2016-07-17T23:54:18+5:302016-07-18T00:03:07+5:30

गुन्हा दाखल : वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा राग; कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Prison officer beaten up | कारागृह अधिकाऱ्याला शिपायाची मारहाण

कारागृह अधिकाऱ्याला शिपायाची मारहाण

रत्नागिरी : कारागृहात तपासणी सुरू असताना शिपायाने त्याच्याकडील कागदाची पुडी लपवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण वरिष्ठांना कळवल्याचा राग येऊन त्या शिपायाने तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार रत्नागिरीतील विशेष कारागृहात शुक्रवारी घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यामुळे कारागृहातील सुरक्षेचा मुद्दाच पुढे आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील विशेष कारागृहात युवराज पाटील हा शिपाई म्हणून काम करतो. शुक्रवारी कारागृहाची तपासणी सुरू असताना त्याने त्याच्याकडील पुडी लपवण्याचा प्रयत्न केला. तुरुंग अधिकारी नागनाथ भानवसे यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. याचा राग येऊन युवराजने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी शिपाई युवराजविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षेचा मुद्दाच ऐरणीवर आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याला शिपायाकडून मारहाण होत असेल तर उर्वरितांच्या सुरक्षेचं काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. (प्रतिनिधी)
‘पुडी’मागे दडलंय काय?
- शिपाई युवराजकडे सापडलेल्या पुडीत नेमके काय होते? याचाही तपास पोलिस करणार आहेत.
- अद्याप तरी केवळ आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- युवराजकडे सापडलेल्या ‘पुडी’ प्रकरणाची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आल्याने या ‘पुडी’ प्रकरणाची चर्चा दिवसभर रंगली आहे.
- कारागृहात घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण कारागृहाची सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
 

Web Title: Prison officer beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.